धाराशिव (प्रतिनिधी)- येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या फार्मसी विभागात विभागप्रमुख म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉ. प्रीती माने यांच्या “इन्स्ट्रुमेंटल ॲनालिसिस “ या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले होते.
या प्रकाशन समारंभासाठी तेरणा ट्रस्टचे विश्वस्त बाळासाहेब वाघ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने तसेच मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विभाग प्रमुख आणि अकॅडमिक डिन डॉ. डी डी दाते, प्रा. सुजाता गायकवाड, प्रा. श्रीकांत अघोर, प्रा. बालाजी चव्हाण, प्रा. संदीप टेकाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ.प्रीती माने यांनी फार्मसीचे पदव्युत्तर शिक्षण मोहाली, पंजाब येथून घेतले आहे. त्यांनी याच विषयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजी नगर येथून डॉक्टरेट ही पदवी, डॉक्टर प्रवीण वक्ते यांच्या मार्गदर्शनाने मिळवलेली आहे. फार्मसी विभागात त्यांचे भरीव योगदान असून त्यांनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध पेपर प्रेझेंट व पब्लिश केलेले आहेत. तसेच त्यांचे तीन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पेटंट देखील आहेत. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ.पद्मसिंह पाटील, आमदार आणि विश्वस्त राणाजगजीतसिंह पाटील, विश्वस्त मल्हार पाटील व सर्व विश्वस्त यांनी अभिनंदन केले. यावेळी बोलताना विश्वस्त बाळासाहेब वाघ म्हणाले की, डॉ.माने यांनी यापुढे आपल्या ज्ञानाचा उपयोग विद्यार्थ्यांसाठी करून त्यांना अद्ययावत घडवावे. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने यांनीही डॉ.प्रीती माने यांना शुभेच्छा देऊन त्यांच्या या पुस्तकाचे कौतुक केले.आणि नक्कीच या पुस्तकाचा विद्यार्थ्यांना फायदा होईल असेही ते म्हणाले.
यावेळी डॉ. प्रीती माने यांनी सर्वांचे आभार मानून हे कौतुकच आपल्या पुढील कार्यास प्रेरणा देत राहील असा विश्वास व्यक्त केला. तसेच त्यांनी आपल्याला डॉ. प्रवीण वक्ते, डॉ.अरविंदकुमार बंसल, डॉ. सरसिजा सुरेश, डॉ. संजय वाघ, डॉ. सचिन भुसारी, डॉ. बालाजी वाकुरे, डॉ. राजेंद्र मराठे, डॉ. सरणजीत सिंग व डॉ. विक्रमसिंह माने यांचे मार्गदर्शन लाभले असे सांगितले. डॉ. माने यांच्या या लेखनाबद्दल महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी त्यांचे कौतुक केले.