कळंब (प्रतिनिधी) - गोंदवले जि. सातारा येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय प्राथमिक शिक्षक महासंघ व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या महामंडळ सभेत जिल्हापरिषद प्राथमिक शाळा भाटशिरपुरा शाळेचे मुख्याध्यापक बाळकृष्ण तांबारे यांची राष्ट्रीय प्राथमिक शिक्षक महासंघाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी फेरनिवड निवड करण्यात आली.

राष्ट्रीय प्राथमिक शिक्षक महासंघ व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची संयुक्त महामंडळ सभा नुकतीच शिक्षक महासंघाचे नेते संभाजीराव थोरात यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत शेतकरी भवन गोंदवले जि. सातारा येथे संपन्न झाले. या वेळी संभाजीराव थोरात यांनी राष्ट्रीय प्राथमिक शिक्षक महासंघाची नूतन कार्यकारणी जाहीर केली. या कार्यकारणीत मराठवाड्यातून राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून कळंब तालुका शिक्षक पतसंस्थेचे अध्यक्ष तथा प्राथमिक शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांची राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून फेरनिवड करण्यात आले. 

तांबारे गेल्या 35 वर्षांपासून शिक्षक संघाच्या चळवळीत पूर्णवेळ सक्रिय आहेत. यापूर्वी त्यांनी 3 वर्षे कळंब तालुका अध्यक्ष,13 वर्षे धाराशिव जिल्हाध्यक्ष, 1 वर्ष राज्यकार्याध्यक्ष 8 वर्षे राज्याध्यक्ष तर गेल्या 3 वर्षांपासून राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून उत्कृष्ट कार्य केले आहे तर गेली 20 वर्षांपासून कळंब शिक्षक पतसंस्थेचे अध्यक्ष म्हणून कार्य करत आहेत. तसेच शिक्षक चळवळीत काम करत असतानाही त्यांनी आपल्या शाळेकडे कसलेही दुर्लक्ष न करता शाळेचा दर्जा उंचावण्यासाठी सतत प्रयत्न करून शाळेतील सर्व शिक्षकांच्या सहकार्याने शाळेला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात सतत दोन वर्षे प्रथम क्रमांक घेतला.

श्री तांबारे यांचे संघटन, सहकार व शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल राज्यस्तरीय पुरस्कार  मिळाला आहे. या घोषित करण्यात आलेल्या राष्ट्रीय प्राथमिक शिक्षक महासंघाच्या कार्यकारणीत राष्ट्रीय अध्यक्ष  आबासाहेब जगताप, उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे,नेते बाळासाहेब झावरे, महासचिव म. ज. मोरे यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली.

या महामंडळ सभेस माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर,आ. अतुल भोसले कराड,आ. मनोज घोरपडे कराड , आ सचिन पाटील फलटण , शिक्षक नेते बळवंत पाटील हे उपस्थित होते. या निवडीबद्दल श्री तांबारे यांचे सोमनाथ टकले, भक्तराज दिवाने, संतोष देशपांडे, विट्टल माने, सुधीर वाघमारे, धनाजी मुळे अभिनंदन केले.


 
Top