धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव - कळंब विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख श्री. कैलास घाडगे पाटील यांचा वाढदिवस धाराशिव शहरात मंगळवारी (दि. 25) विविध समाजोपयोगी कार्यक्रमाने उत्साहात साजरा करण्यात आला.
वाढदिवसानिमित्त सकाळी श्री धारासुरमर्दिनी देवीची महाआरती करून आमदार कैलास दादा पाटील यांना उदंड आयुष्य लाभो अशी प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर हजरत ख्वाजा शमसोद्दिन गाजी यांच्या दर्ग्यात चादर अर्पण करण्यात आली. तसेच छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रसंत गाडगे महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
त्यानंतर जिल्हा स्त्री रुग्णालयात रवि वाघमारे यांच्या वतीने आज जन्मलेल्या बालकांना कपडे आणि माताना साडीचोळी देऊन सन्मान करण्यात आला. तर सर्व रुग्णांना प्रवीण केसकर यांच्या वतीने फळे वाटप करण्यात आली. त्याचबरोबर नगर परिषद शाळा क्र. 22 येथे विद्यार्थ्यांना फळे व खाऊ वाटप करण्यात आले.
या सर्व कार्यक्रमांना माजी नगराध्यक्ष दत्ता आप्पा बंडगर, माजी शहर प्रमुख प्रवीण कोकाटे, शहर प्रमुख सोमनाथ गुरव, युवा सेना शहर प्रमुख रवि वाघमारे,तुषार निंबाळकर, बाबा मुजावर, अतिश पाटील, पंकज पाटील, पांडू भोसले, हनुमंत देवकते, विनोद केजकर, अशोक पेठे, देवानंद एडके, गणेश साळुंके, सतीश लोंढे, अभिराज कदम, अजिंक्य राजेनिंबाळकर, सह्याद्री राजेनिंबाळकर, हर्षद ठवरे, अमित उंबरे, यशवंत शहापालक, सुमित बागल, राकेश सूर्यवंशी, गणेश राजेनिंबाळकर, प्रशांत पाटील, अजित बाकले, सुरेश गवळी, प्रवीण केसकर, मनोज पडवळ, चेतन वाठवडे, अभिजित देशमुख, सुनील आंबेकर, सुनील वाघ, लक्ष्मण जाधव, शहाजी पवार, मुकेश चौगुले, गफुर शेख, साबेर सय्यद, शहाबाज पठाण, बद्दू शेख,प्रदीप साळुंके, साजिद पठाण, केदार हिबारे, अक्षय जोगदंड, राजाभाऊ बहीर, अविनाश शेरखाने, अभिषेक पाटील, शेरखाने, वैभव उंबरे, नेताजी राठोड, कलीम कुरेशी, मिलिंद पेठे, शौकत भाई, पृथ्वीराज खोचरे, महेश लिमये, सुनील गायकवाड,महेश उपासे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.