धाराशिव (प्रतिनिधी)- नुकतेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धाराशिव येथील अधिष्ठाताचा पदभार स्वीकारणारे अधिष्ठाता डॉ शैलेंद्र चौहान यांचे स्वागत रुग्ण कल्याण समिती व इथिकल कमिटीच्या वतीने पुष्पगुच्छ,शाही टोपी घालून करण्यात आले,विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.विशेष म्हणजे महिला रुग्णालयातील अडचणी बाबत झाली,कमी खाट व इतर बाबींची कमतरता पाहता वैद्यकीय अधीक्षका डॉ.स्मिताताई गवळी यांनी करीत असलेल्या कामाचे कौतुक झाले,रुग्ण कल्याण समितीच्या वतीने राबविण्यात येत असलेले उपक्रम पाणी दान,रक्तदान व इतर बाबींवर चर्चा झाली,यावेळी रुग्ण कल्याण समिती सदस्य अब्दुल लतिफ,इथिकल कमिटी सदस्य गणेश वाघमारे,आरोग्य मित्र शेख रऊफ,स्वच्छता अभियान दुत नामदेव वाघमारे,जिल्हा ग्राहक आधार संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष सलीम शेख,गयासोद्दिन शेख,तर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिक्षक डॉ.तानाजी लाकाळ,महिला रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षका डॉ स्मिताताई गवळी,डॉ.संजय नलावडे,डॉ.चव्हाण,श्री.लोंढे सह इतर उपस्थित होते.शेख रऊफ यांनी समारोप करतांना अधिष्ठाता यांना शायरीतुन शुभेच्छा दिल्या.