कळंब (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा ईटकुर व खराटे परिवाराच्या वतीने सेवापूर्तीबद्दल जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा ईटकुर च्या केंद्रीय मुख्याध्यापिका सौ. शारदा सुभाष मुंडे- लाटे यांचा सेवापूर्ती समारंभ आयोजित करण्यात आलेला होता. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. साईनाथ अडसूळ यांची उपस्थिती होती. प्रमुख अतिथी ह. भ. प. महादेव महाराज अडसूळ राष्ट्रीय प्राथमिक शिक्षक संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा कळंब तालुका शिक्षक सोसायटीचे चेअरमन बाळकृष्णजी तांबारे, प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ. रमेश जाधवर, उद्योजक तथा अध्यक्ष स्वप्नपूर्ती नागरी सहकारी पतसंस्था कळंब विठ्ठल माने सर, माननीय सौ. मैनाबाई मुळे शिक्षण विस्तार अधिकारी, सुशीलजी फुलारी शिक्षण विस्ताराधिकारी ईटकुर बीट, केंद्रप्रमुख श्री. सोमनाथ चंदनशिव सर  ईटकुर, डॉ. ऋषिकेश लाटे (सर्जन मुंबई), डॉक्टर संजीवनी जाधवर ,मा.श्री. सुभाष  लाटे मुख्याध्यापक विद्या भवन प्राथमिक विद्यामंदिर कळंब, माननीय श्री. प्रशांत घुटे तालुका अध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ कळंब ,मा.सौ. भाग्यश्री खराटे इंजिनिअर पुणे, इंजिनीयर प्रकाश खराटे,संभाजी जगदाळे शिक्षण विस्तार अधिकारी कळंब, जिल्हा परिषद प्रशालेचे मुख्याध्यापक श्री .चंद्रकांत शिंदे ,शाळा व्यवस्थापन समिती माजी अध्यक्ष सचिनजी गंभीरे, हेमंत पोते तसेच ईटकुर केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, मित्रपरिवार, आप्तेष्ट व केंद्रातील सर्व शिक्षक वृंद कार्यक्रमास उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता- राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमा पूजनाने व दीपप्रज्वलनाने करण्यात आली.  यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. साईनाथ अडसूळ यांनी सेवापूर्ती कार्यक्रमाचे निमित्ताने त्यांना शुभेच्छा दिल्या.  ह. भ. प.  महादेव महाराज अडसूळ यांनी सौ. शारदा मुंडे-लाटे  यांच्या कामाचं कौतुक केले. तसेच शैक्षणिक ,सामाजिक क्षेत्रात लाटे परिवार नेहमीच आपलं योगदान देणारा असल्याचे आवर्जून नमूद केले, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणाऱ्या बाळकृष्ण तांबारे यांनीही श्रीमती. शारदा मुंडे-लाटे यांची शैक्षणिक कारकीर्द अतिशय प्रशंसनीय  असल्याचे सांगितले. तसेच आपल्या विनोदी शैलीत श्रीम. मुंडे मॅडम यांच्या शैक्षणिक कार्यावर प्रकाश टाकला. श्री. प्रशांत घुटे , सोमनाथ चंदनशिव  -केंद्रप्रमुख , माजी केंद्रप्रमुख श्री .गामोड सर यांनी आपली मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या.

सेवापूर्ती कार्यक्रमास बिक्कड सर, श्री. महादेव खराटे सर, श्री. बालाजी चौधरी सर ,होगले सर , श्री. जगदाळे सर,श्री. निशिकांत अडसूळ ,श्री. ऋषीकुमार साबळे सर, श्री .क्षीरसागर सर ,प्रशालेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पावले दादा , युवा प्रशिक्षणार्थी कुमारी श्वेता अडसूळ मॅडम, मानसी अडसूळ मॅडम तसेच इतर शाळांचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद कार्यक्रमास उपस्थित होते. सेवापूर्ती व निरोप समारंभाच्या निमित्ताने शाळेला एक सुंदर डायस व केंद्रातील सर्व शाळांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा मुंडे मॅडम यांनी भेट दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय तांबारे यांनी केले तर सूत्रसंचालन उत्तरेश्वर शिंदे यांनी केले. सर्व कार्यक्रमाचे आयोजन नियोजन आदरणीय  नवनाथ अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व शिक्षक बांधवांच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पडला. तसेच आभार प्रदर्शन गणेशजी कोठावळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

 
Top