तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेञ तुळजापूर शहरात येणाऱ्या भक्तांच्या वाहनावरील वाहनतळ कर रद्द करावा व खाजगी कंपनीला ठेका न देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्री यांना निवेदन देवुन केली आहे.
तिर्थक्षेञ तुळजापूरात तुळजाभवानीच्या दर्शनार्थ खाजगी वाहनांनी मोठ्या संखेने भाविक येतात. वाहनतळ ठेका पार्किंग ठेकेदार (भवानीशंकर) यांचा करार संपल्यामुळे नगर परिषद तुळजापूर सध्या पार्किंग पावत्या फाडत आहेत. वाहनतळ ठेका नावाखाली तुळजापूरमध्ये येणाऱ्या भक्तांची अतोनात लुट केली जात आहे. यामुळे तुळजापूर तिर्थक्षेत्र हे बदनाम होत चाललेले आहे. तुळजापूर शहरात वाहन घेऊन येणाऱ्या भक्तांना तुळजापूर शहर हे भक्तांसाठी वाहनतळ कर पार्किंग मुक्त करण्यात यावे अशी मागणी केली आहे.
सध्या नगर परिषद तुळजापूर येणाऱ्या भक्तांची वाहन पार्किंग पावत्या फाडत असून, भररस्त्यात, भरचौकात भक्तांच्या गाडया आडवून पार्किंग पावत्या फाडवु नये व अरेरावीचे भाषा वापरु नये, याची गाभिर्यपुर्वक दक्षता घेण्यात यावी. तरी येणाऱ्या भक्तांसाठी वाहनकर मुक्त करण्यात यावे.