तुळजापूर (प्रतिनिधी) - श्रीतुळजाभवानी मातेच्या दर्शनार्थ मंगळवारी माघ पोर्णिमा आल्याने देविदर्शनार्थ भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
माघ पोर्णिमा दिनी मंगळवारी पहाटे 1 वाजता चरणतिर्थ होवुन धर्मदर्शनास आरंभ झाला. आज भाविकांनी दही, दुध पंचामृत अभिषेक पुजा, भोगीपुजा, गोंधळ, जावळ दंडवत, पुरणाचा नैवध, माळपरडी घेणे असे धार्मिक विधी भक्ती भावाने केले.