धाराशिव (प्रतिनिधी)- स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित श्री रामानंद महाराज विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय काजळा येथे बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ प्रसंगी तेरणा महाविद्यालय धाराशिव ,मराठी विभागातील प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. अविनाश ताटे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, तसेच आजच्या विद्यार्थ्यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, मासाहेब जिजाऊ, माता रमाबाई, सावित्रीबाई फुले यांच्या विचाराचे वाचन करून जीवन नक्कीच यशस्वी करता येते असे सांगितले. त्याच बरोबर योग्य ध्येय, योग्य मार्गदर्शन, आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर यश प्राप्त करता येते यांसंदर्भात अनेक किर्तीवान व्यक्तीची दाखले देऊन मार्गदर्शन केले. 

या कार्यक्रमामाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य शिवाजी वागतकर यांनी अध्यक्षीय समारोप केला. प्रास्ताविक मालोजी पवार यांनी तर सुत्रसंचलन आसावरी मगर व सिध्दी पंडित यांनी केले. तसेच आभार आर. डी. पवार मानले. कार्यक्रम प्रसंगी सर्व विद्यार्थी, शिक्षक, आणि शिक्षकेत्तर कृमचारीवृध्द उपस्थित होते. 


 
Top