तुळजापूर (प्रतिनिधी) - श्रीतुळजाभवानी मातेच्या मुख्य गाभा-या सुरक्षिततेबाबत योग्य ती तात्काळ काळजी घेत नसल्याच्या निषेधार्थ श्रीतुळजाभवानी पाळीकर पुजारी मंडळातर्फ गुरुवार दि. 6 फेब्रुवारी रोजी मंदीर प्रशासकीय कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
यावेळी श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थान अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी याना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, श्री तुळजाभवानी देविजींचे मंदिरात मंदिरसंस्थानचे स्वनिधीतुन जिर्णोध्दाराचे काम पुरातत्व विभागामार्फत सुरु आहे. सदर सुरु करण्या आगोदर मंदिरातील चांदी दरवाजाच्या दोन्ही बाजुनी सिंहाच्या गाभा-यात प्रवेश करण्यासाठी प्रवेशव्दार, पलंगाच्या खोलीतुन बाहेर पडण्यासाठीचा मार्ग व एक्झीट फॅन पासुन बाहेर पडण्याच्या मार्गास पुरातत्वे विभागाने परवानी दिल्याने सदर कामे सुरु केल्याचे प्रत्यक्ष बैठकीत आम्हाला सांगीतले होते. सध्या काम सुरु केलेले असून, सदर प्रवेशव्दारांबाबत आम्ही वारंवार विचारणा करुनही आम्हाला याबाबत माहिती मिळत नाही. तसेच ज्यावेळी मुख्य गाभा-यातील व चोपदार दरवाजा भिंतीवरील टाईल्स काढल्यानंतर जे मुळ बांधकाम आहे ते अत्यंत जीर्ण झाल्याचे व सदरील बांधकाम सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रथमदर्शनी अत्यंत धोकादायक असल्याचे निदर्शनास आलेले आहे.
वरील दोन्ही बाबतीत मंदिर प्रशासनामार्फत अथवा पुरातत्त्व विभागामार्फत काय कार्यवाही अनुसरण्यांत येत आहे. तसेच मुख्य गाभा-याचे सुरक्षिततेबाबत तातडीने कार्यवाही अपेक्षीत असताना आजपावेतो कोणतही कार्यवाही अनुसरण्यांत येत नसल्याचे दिसून येत असल्याने गुरुवारी लाक्षणिक लाक्षणीक उपोषण करण्यात आले.यावेळी पुजारी मंडळ अध्यक्ष विपीन शिंदे भोपे मंडळ अध्यक्ष अमरराजे कदम उपाध्य मंडळ अध्यक्ष अनंत कोंडो काँग्रेस चे जिल्हाअध्यक्ष धिरज पाटील प्रा धनजंय लोंढे सह पुजारी यात ससहभागी झाले होते.