वाशी (प्रतिनिधी)-  येथील जि.प.प्रा.शाळा, शिवशक्तीनगर येथे सोमवारी दि.3 फेब्रुवारी रोजी बाल आनंद मेळावा व हळदी कुंकू कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष धनश्री चेडे या तसेच उपाध्यक्ष बाळासाहेब राऊत व इतर सदस्य हजर होते. व्यवस्थापन समिती अध्यक्षा धनश्रीताई चेडे यांच्या हातून फित कापून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. सावित्रीबाईंच्या फोटोचे पूजन झाले व सर्वांनी स्टॉल वरील चविष्ट पदार्थांचा आस्वाद घ्यावयास सुरुवात केली.

गटशिक्षणाधिकारी सोमनाथ घोलप, व्यापारी नितीन टेकाळे, प्रियदर्शनी बँकेचे कॅशियर उमेश मोहिते तसेच ज्ञानेश्वर करडे, मुजीब बागवान, अहमद पटवेकर,समाधान गवारे वकील, दत्तात्रय मुरकुटे वकील, वशीम बागवान, राणी जगताप इत्यादी शिक्षण प्रेमी नागरिक व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जिल्हास्तरावर अधिकारी कर्मचारी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन यश मिळवणारे शिवशंकर राऊत, ज्ञानेश्वर जानगेवाड,सुधीर उंद्रे यांचा शाळा व्यवस्थापन समिती व मुख्याध्यापिका यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे स्टॉल मांडले होते.या स्टॉल मधून 27310 रुपयांची उलाढाल झाली.या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना व्यवहार कसे करायचे हे समजले.या कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने पालक वर्ग उपस्थित होता आणि भरपूर प्रमाणात खरेदी केली विविध पदार्थाचा आस्वाद घेतला.  यावेळी उपस्थित अनुराधा देवळे (मुख्याध्यापिका), छाया अंधारे, नंदूबाई उकरंडे, दत्तात्रय कोरे, शिवशंकर राऊत,सुनिता वाकडे, ज्ञानेश्वर जानगेवाड, बबीता गवळी, सुधीर उंद्रे, प्रशिक्षणार्थी अश्विनी दोडके यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.

 
Top