धाराशिव (प्रतिनिधी)-  येवती  ता.जि धाराशिव येथे प्रहार दिव्यांग संघटनेच्या 121 व्या शाखेचे उत्साहात उदघाटन करण्यात आले,या शाखेचे उदघाटन प्रहारचे जिल्हाध्यक्ष मयुर काकडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाखेच्या अध्यक्षपदी धनंजय खांडेकर , शाखेचे उपाध्यक्षपदि गणेश माळी, सचिव पदी संजय पडळकर , श्रीकृष्ण पोटे, यांच्यासह गावातील दिव्यांग बांधवाची विविध पदावर निवड करण्यात आली 

 सदरील शाखेच्या उदघाटन प्रसंगी जिल्हाध्यक्ष मयुर काकडे,शहराध्यक्ष जमीर_शेख, कार्याध्यक्ष,महादेव खंडाळकर, उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील,, यांच्यासह गावातील इतर मान्यवर व ग्रामस्थ उपस्थीत होते. यावेळी प्रहारचे जिल्हाध्यक्ष यांनी सर्व पदाधिकारी यांचे अभिनंदन केले आणि येत्या काळात सर्व दिव्यांग बांधवांचे प्रश्न मार्गी लावण्याची खात्री दिली यावेळी सर्व धारूर गावातील प्रतिष्टीत व वयोवृद्ध नागरिकांची दर्शनीय उपस्थिती होती.

 
Top