कळंब (प्रतिनिधी)- येथील सामाजिक उपक्रमात सदैव अग्रेसर वर्गमित्रांच्या फ्रेंड्स फोरेएवर फाउंडेशन च्या वतीने आयोजित कळंब येथील किसान मित्र कृषी महोत्सवात देशी विदेशी अशा दीडशेहून अधिक जातीची श्वान पाहण्याची अपूर्व संधी कळंबकरांना प्राप्त होणार आहे.
कळंब येथील वर्ग मित्रांच्या विधायक विचारधारेतून येथील तालुका क्रीडा संकुलावर शेतकरी बांधवांसाठी दिनांक 1,2,3,4 मार्च 2025 रोजी भव्य अशा किसान कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. यात शेतीची अत्याधुनिक अवजारे, ड्रोन, कृत्रिम बुद्धिमत्ता अशा महत्वपूर्ण बाबीसह य महोत्सवामध्ये पशुप्रदर्शन हा एक आकर्षणाचा भाग असून यातअश्व प्रदर्शन, गाय प्रदर्शनासह श्वान प्रदर्शन ठेवण्यात आले आहे. हे श्वान प्रदर्शन सर्वांसाठी आकर्षणाचा भाग ठरणार असून यात पाकिस्तानी बले, रोटवेर, मिनी पाम, कल्चर पाम, ग्रेट डेन, डॉबरमॅन अशी 150 हून अधिक विविध देशी-विदेशी जातीची पहावयास मिळणार आहेत. या श्वान प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या स्वरांसाठी कूलिंग व इतर सुसज्जय व्यवस्था करण्यात आलेली आहे. सर्वोत्कृष्ट ठरणाऱ्या श्वानास प्रथम, द्वितीय, तृतीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या संधीचा सर्व श्वानप्रेमींनी लाभ घ्यावा असे आवाहन फ्रेंड्स फोरेवर फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.