तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री सच्चितानंद सद्गुरू श्री वीरनाथ मल्लनाथ महाराज संस्थान श्रीक्षेत्र औसा यांच्या माघ पायी वारी दिंडी पालखी रविवार दि.02 फेब्रुवारी रोजी तुळजापूरात दाखल होवुन आई जगदंबेचा अभंग सेवा व दर्शन केल्यानंतर तिर्थक्षेञ पंढरीकडे रवाना झाले.
नाथ संस्थानचे पाचवे पिठाधिपती सद्गुरु श्री गुरुबाबा महाराज औसेकर यांच्या अधिपत्यात आणि सद्गुरू गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या नियोजन मार्गदर्शनात माग पायी वारी दिंडी सोहळा विठू नामाच्या गजरात 2 फेब्रुवारी रोजी आई तुळजाभवानी मंदिरात दुपारी दोन वाजता पोहोचेले. तेथे आई जगदंबेचा अभंग सेवा व दर्शन आटोपून घाटशिळ मार्गे रात्र मुक्कामासाठी पालखी दिंडी आळजापूरलाला मुक्कामी रवाना झाली.
हभप गुरुबाबा महाराज औसेकर यांचा सन्मान
श्री. विठ्ठल रुक्मीणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष हभप. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी श्री. तुळजाभवानी देवींचे दर्शन घेतले. श्री. तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सहायक व्यवस्थापक (धार्मिक) अमोल भोसले, विश्वास सातपुते, सुरक्षा निरीक्षक विक्रम कदम, नवनाथ खिंडकर आदी उपस्थित होते. नगर परीषदकडून कार्यालयीन अधीक्षिक वैभव पाठक यांनी तुळजापूर खुर्द येथे पायीदिंडीचे स्वागत केले.