तुळजापूर (प्रतिनिधी) - तालुक्यामध्ये बोगस डॉक्टर यांचा सुळसुळाट सुरू असून आरोग्य खाते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून अनेकदा निवेदन देऊन पण तसेच वारंवार लोकशाही मार्गाने आंदोलन करून पण बोगस डॉक्टर यांच्यावर कारवाई केली जात नसल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती यांच्या वतीने दिनांक 17 फेब्रुवारी रोजी हलगी वाजवा हे आंदोलन करण्यात येणार आहे.
तुळजापूर तालुक्यामध्ये कांही बोगस डॉक्टर मुंबई काऊन्सीलीगची परवानगी नसतानाही ग्रामीण भागात मोठ-मोठे क्लिनिक टाकुन रुग्णांच्या आरोग्याशी खेळ करत आहे. बोगस इलाज केला जात असल्याने रुग्णांचा जीवाला धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच अनेक डॉक्टर पदवीचा दुरूपयोग करत असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. तसेच रूग्णांना व्यवस्थित औषधोपचार केला जात नाही. तसेच हॉस्पीटलमध्येच रूग्णांना औषध गोळ्या दिल्या जात आहेत. हे सर्व मिळून साधारणतः ग्रामीण भागातील रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार चालु आहे. तुळजापूर तालुक्यातील बोगस डॉक्टर यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र तसेच पदवी मुंबई कौन्सीलींगचा परवाना तसेच औषध विक्री परवाना आहे का याची तपासणी करून दोषीवर फौजदारी स्वरूपाची कार्यवाही करण्यात यावी अशा आशयाचे संदर्भीय पत्रे देऊनही आपण अद्यापही कोणतीही कार्यवाही केली नाही. निद्रस्त अधिकाऱ्यांना जागे करण्यासाठी दि.17 फेब्रुवारी रोजी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय तुळजापूर येथे हलगी वाजवून कार्यालयासमोर अधिकाऱ्यांना जागे करण्याचे आंदोलन करण्यात येईल तसेच संबंधीतांवर कारवाई होत नाही तो पर्यंत कार्यालयास टाळा ठोको आंदोलन करण्यात येणार आहे. याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तुळजापूर तालुक्यात पदवी नसलेल्या व स्वयंघोषित डॉक्टर की पदवी असणाऱ्या बंगाली बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट सुरू आहे. अनेक वेळेस निवेदन देऊनही आंदोलन करूनही आरोग्य खात सलाईन वर आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे. बोगस डॉक्टरांना का अभय दिला जात आहे? सुदैवाने काही अनुसूचित प्रकार घडल्यास याला कोण जबाबदार आहे. बोगस डॉक्टर का आरोग्य प्रशासन याचे उत्तर सांगणे कठीण आहे.