धाराशिव (प्रतिनिधी) - शहरातील कलाविष्कार अकादमी द्वारा हौशी छंदी गायकांचा समुह मेलडी स्टार्स यांच्या वतीने स्वरसम्राज्ञी स्व.लता मंगेशकर यांच्या 3 ऱ्या पुण्यतिथी निमित्त त्यांनी गायलेल्या बहारदार गीतांच्या गायनातून अभिवादन करण्यात आले. 

प्रथम प्रतिमा पुजन संस्थापक अध्यक्ष युवराज नळे, समन्वयक शरद वडगावकर, सुशील कुलकर्णी यांचे हस्ते करण्यात आले. जेष्ठ  विधिज्ञ  दिपक                  पाटील मेंढेकर, अनिल मालखरे, सविता भोसले, रविंद्र कुलकर्णी, विधिज्ञ विद्युलता दलभंजन, शेषनाथ वाघ, नितीन बनसोडे, धनंजय कुलकर्णी, मारुती लोंढे, सुलक्षणा टिळक, राजाभाऊ कारंडे, युवराज नळे ,शरद, वडगावकर, सुशील कुलकर्णी यांनी लताताईंच्या बहारदार गीतांचे गायन केले. सदर अभिवादन मैफिल यशस्वीतेसाठी पृथा कुलकर्णी, अर्णवी, ओझस कुलकर्णी, शिरीष श्रीसुंदर यांनी परिश्रम घेतले.

 
Top