तुळजापूर (प्रतिनिधी)- शहरातील 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी इयत्ता नववी मध्ये शिकत असून अल्पवयीन मुलगी घरी एकटी असताना आरोपीने तिच्या मनात लज्जा वाटेल असे कृत्य करून तिचा विनयभंग केला. या प्रकरणी तुळजापूर पोलीस स्टेशन येथे 14 वर्षीय अल्पवयीन मुलींनी दिलेल्या फिर्यादीवरून विनयभंगासह पोस्को गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार, तुळजापूर शहरातील एका भागातील अल्पवयीन मुलगी जे की नववी वर्गात शिकत असून दिनांक 29 जानेवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास अल्पवयीन मुलगी ही घरी एकटी असताना आरोपीने घरात प्रवेश करून अल्पवयीन मुलीच्या उजव्या हातास धरून जवळ ओढून विनयभंग केला. तसेच फिर्यादीच्या आईस धक्काबुक्की करून ढकलून देऊन पळून गेला. अशा प्रकारची फिर्याद अल्पवयीन मुलींनी तुळजापूर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध विनयभंग, पोस्को, गुन्हा दाखल झाला असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रोहिणी जाधव पिंक पथक तुळजापूर हे करत आहेत.