भूम (प्रतिनिधी)-  भूम येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात संत गाडगेबाबा 149 वी जयंती संत गाडगेबाबा जयंती उत्सव समितीच्या वतीने साजरी करण्यात आली.

यावेळी माजी नगराध्यक्ष संजय नाना गाढवे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सुनील थोरात ,दिलीप गाढवे,उपस्थित होते .यावेळी संगीत भजनी कार्यक्रम,महाप्रसाद करण्यात आला .विनोदी जुगलबंदी भारुड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये ह भ प संदीप महाराज मोहिते व ह भ प अण्णा महाराज चव्हाण यांच्या मध्ये भारुडाची जुगलबंदी जमली होती. या कार्यक्रमासाठी संतोष लोखंडे,दादा लोखंडे,अण्णा काटे,पप्पू लोखंडे,बबलू शिंदे,राजाभाऊ राऊत,माऊली राऊत,चंदू पवार,जाधव, शिंदे,उपस्थित होते .यावेळी समाजातील सर्व समाज बांधव महिला भगिनी उपस्थित होत्या.

 
Top