तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेञ तुळजापूर येथील ड्रग्ज प्रकरणी मुंबई येथुन एका महिलेला अटक करण्यात आली. आकी पकडली आका कधी पकडणार असा सवाल शहरवासियांमधुन केला जात आहे. तुळजापूर शहरात हस्तकांच्या माध्यमातून मुंबई येथुन ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या एका महिलेला मुंबई येथुन अटक करण्यात आली असुन तिला रविवारी रात्री तामलवाडी पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. तिची वैद्यकीय तपासणी करुन सदरील महिलेला रात्रीच न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने तिला 3 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापरावराव सरनाईक, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या दबाव्याने, जनक्षोभ पार्श्वभूमीवर मुंबईच्या आकीस पकडुन अटक करण्यात आले. ड्रग्ज प्रकरणी कितीही मोठा गुन्हेगार असो, कुण्याही पक्षाचा असो त्याची गय करु नका, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक यांना दिले होते. त्यानुसार पोलिस अधीक्षक संजय जाधव यांनी कडक पावले उचलली व पोलीस अधीक्षक यांच्या सुचनेनुसार ड्रग्ज प्रकरणाचा कसुन तपास सुरू झाला. या तपासामध्ये ड्रग्जचे मुंबई कनेक्शन असल्याचे निष्पन्न झाले. तामलवाडी पोलिसांचे एक पथक मुंबई येथे पोहचले. मुंबई येथील एक महीला ड्रग्जचा पुरवठा करत असल्याची खात्री झाली व तामलवाडी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गोकुळ ठाकुर यांनी मुंबई येथे पाठवलेल्या पोलिस पथकाने ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या संगीता गोले या महिलेला मुंबई येथुन बेड्या ठोकल्या. दि.23 फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा तिला पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले. सध्या ड्रग्ज कारवाई प्रकरणी शहरात अनेक चर्चला उधाण आले आहे. ड्रग्ज मध्ये अनेक अल्पवयीन तरुण चुकीचा मार्गाने यात अडकल्याची चर्चा आहे.