तुळजापूर (प्रतिनिधी)-  ड्रग्ज, अवैध धंदे, चोऱ्या, अतिक्रमणामुळे बदनाम झालेल्या तिर्थक्षेत्र तुळजापूर शहरात कायदा सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी नुतन पोलिस निरक्षक अण्णासाहेब मांजरे अँक्शन मोड मध्ये आले आहेत. कित्येक वर्षानंतर अवैध धंदे सध्या तरी बंद असल्याने हा बदल नागरिकांना दिलासा देणारा ठरत आहे.

विशेष म्हणून दोन्ही महाव्दार समोर किरकोळ विक्रेत्यांना रस्त्यामध्ये बसु दिले जात नसल्यामुळे भाविकांना मंदिरात ये-जा करताना जी कसरत करावी लागली होतीती बंद झाली आहे. या भागाने प्रथमच मोकळा श्वास घेतला आहे. सध्या अवैध धंद्यांना प्रतिबंध केला जात आहे. हाँटेल मध्ये दारु पिणा-यांना प्रतिबंध केला आहे. रिक्षावाल्यांना बोलवुन घेऊन तंबी दिली आहे. सध्या सर्वाधिक भाविकांची गर्दी असणाऱ्या श्रीतुळजाभवानी दोन्ही मंदीर महाव्दार समोर छोटे-मोठे अतिक्रमण न होण्यासाठी पोलिस कर्मचारी नेमले आहेत. ते दिवसभर बांगडी वाल्या, छञ्या वाले येथे येवु नये म्हणून सतत प्रयत्न करीत आहेत. माञ उतार रस्त्यावर असणारे अतिक्रमणे हटवले जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तसेच छञपती शिवाजी महाराज चौक, दिपक चौक, एसटी स्टँड रोड सह अनेक भागात बँरेकेंटींग लावुन वाहतुकीला शिस्त लावण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत.


 
Top