परंडा (प्रतिनिधी) - छत्रपती शिवाजी महाराज चौक ते एसटी बस स्थानक परंडा मुख्य रस्त्याचे काम अपुरे असून ते सध्या बंद पडले आहे त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या लोकांना प्रचंड प्रमाणात धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे त्याचबरोबर या मार्गावरुण वाहतुक करणाऱ्या रस्त्यावर मोठ मोठ खड्डे पडल्यामुळे अडथळे निर्माण होत आहेत तसेच धुळीमुळे नागरिकांना शोषणाचा त्रास चालू आहे याच मुख्य मार्गावर जवळपास परंडा शहरातील जिल्हा रुग्णालयासह इतर खाजगी विविध रुग्णालय ,पोलीस स्टेशन ,शासकीय विश्रामगृह व शहरातील मुख्य बाजारपेठ आहेत सध्या महाराष्ट्रामध्ये ह्युमन बेटा न्यू हा आजार पसरत आहे त्यामुळे परंडा शहरात प्रचंड प्रमाणात असलेल्या धुळीमुळे हा आजार वाढण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही या मार्गावर असणारे मुख्य बाजारपेठे मधील व्यापारी त्याचबरोबर निजामपुरा , रेवणीभिमनगर ,मंडईपेठ ,नगरपालिका  जवळील नागरिक धुळीमुळे त्रस्त आहेत.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते निळा झेंडा चौक, कुर्डूवाडी रोड परंडा हा देखील मुख्य रस्ता दळणवळणास अतिशय धोकादायक स्थितीमध्ये आहे या मार्गाने कुर्डूवाडी ,पुणे ,पंढरपूर देवस्थाना कडे जाणारा हा मुख्य रस्ता असून याच मार्गे अनेक कारखान्यासाठी ऊस वाहतूक करणारी वाहने रात्रंदिवस वाहतूक करत असतात शहराला जोडणारा हा मुख्य रस्ता असून या रस्त्यावरील मोरे हॉस्पिटल ते निळा झेंडा चौकापर्यंत अनेक मोठमोठे खड्डे पडलेले असून या ठिकाणी रसत्यामुळे अपघात होत आहेत.सोनारीरोड छ.संभाजी महाराज चौक परंडा ते वारदवाडी हा रस्ता करमाळा व बार्शी या शहरांना परंडा शहरातून जाणारा मुख्य रस्ता असून याच मार्गावरून महाराष्ट्राचे कुलदैवत सोनारी येथील भैरवनाथ मंदिरास राज्य पर राज्यातून भाविक येत असतात तसेच याच मार्गावर परंडा कृषी उत्पन्न बाजार समिती असून या ठिकाणी आलेली मोठी वाहने हा मुख्य रस्ता खोदून ठेवलेल्या अपुऱ्या कामामुळे अडथळा निर्मान होऊन अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही याच मार्गावर परंडा शहरातील संत मीरा पब्लिक स्कूल,ग्लोबल इंग्लिश स्कूल,कल्याण सागर विद्यालय ,महात्मा गांधी विद्यालय,रा.गे.शिंदे महाविद्यालय ,बावची विद्यालय ,जिल्हा परिषद प्रशाला परंडा या शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेणारे हजारो विद्यार्थी या मुख्य मार्गावरून ये-जा करत असतात या रस्त्याच्या अर्धवट कामामुळे विद्यार्थ्यांना येण्या जाण्यास त्रास सहन करावा लागतो आहे यातून एखादा मोठा अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही तसेच हा रस्ता पाचपिंपळा रोड ते कृषी उत्पन्न बाजार समिती पर्यंत खोदून ठेवण्यात आलेला असून वाढलेली प्रचंड वाहन संख्या रहदारी ऊस वाहतूक करणारी वाहणे या मार्गावरून वाहतूक करतात यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाला असून या मार्गावर कायम छोटे मोठे अपघात होतात त्यामुळे कायम जीव मुठीत घेऊन या ठिकाणाहून ये-जा करावी लागते तरी या पूर्वीही प्रशासनाला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदन देऊन आंदोलने करण्यात आलेली आहेत त्याची कुठलीही दखल घेण्यात आलेली नाही त्यामुळे पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्वरित या सर्व रस्त्यांची अपुरे काम खड्डे मुक्त रस्ते करण्यासाठी तात्काळ कामे सुरू करण्यात यावीत अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रशासनास 15 दिवसाचा अवधी देत आहोत सदर वेळेमध्ये कामे सुरू न झाल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र स्वरूपात आंदोलन छेडण्यात येईल आसा इशारा मा. निलेश मा काकडे तहसील साहेब यांच्या द्वारा मा.ना.देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देऊण देण्यात आला याप्रसंगी फुले आंबेडकर विद्वत सभा राज्यसमन्वयक प्रा.डॉ. शहाजी चंदनशिवे ,जिल्हा समन्वयक प्रा.डॉ.प्रकाश सरवदे ,वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा महासचिव धनंजय सोनटक्के ,जिल्हा सहसचिव मोहनदादा बनसोडे ,परंडा शहराध्यक्ष किरणदादा बनसोडे ,युवा नेते मुख्तार हावरे ,तालुका उपाध्यक्ष मधुकर सुरवसे, युवा आघाडी तालुकाध्यक्ष रणवीर निकाळजे ,किरण गायकवाड ,सादीक शेख शिवाजी सरवदे ,नुरभाई मदारी सह कार्यकर्ते पदाधिकारी आदी उपस्थित होते.


 
Top