परंडा (प्रतिनिधी) - येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलितशिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे. शिंदे महाविद्यालय, परंडा या महाविद्यालयातील
वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने दि.24 जानेवारी 2025 ते 25 जानेवारी 2025 यादरम्यान शैक्षणिक सभेचे आयोजन केले होते. यात सहलीचा ही आढावा घेण्यात आला.
यावेळी प्राचार्य डॉ.सुनील जाधव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित होते. उपप्राचार्य डॉ. महेश कुमार माने,वनस्पती शास्त्र विभाग प्रमुख डॉ.प्रकाश सरवदे, डॉ सचिन चव्हाण, स्टाफ सेक्रेटरी डॉ. शहाजी चंदनशिवे,डॉ.विद्याधर नलवडे, डॉ.सचिन साबळे,डॉ. अतुल हुंबे,डॉ. अक्षय घुमरे ,डॉ.प्रशांत गायकवाड डॉ. अमर गोरे पाटील आदी उपस्थित होते. सहलीचा आढावा डॉ प्रकाश सरवदे यांनी दिला.ते म्हणाले की सहलीचा उद्देश वनस्पतीशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांना पुस्तकातून शिकलेली वनस्पतींची माहिती प्रत्यक्ष निरीक्षणाद्वारे समजावून देणे. विद्यार्थ्यांना वनस्पतींच्या विविध प्रजाती, त्यांचे निवासस्थान, पर्यावरणातील भूमिका आणि संवर्धनाच्या पद्धतींबद्दल प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी देण्यात आली.ही सहल शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, लीड बोटॅनिकल गार्डन, कोल्हापूर,पावनखिंड, कोल्हापूर,आंबेश्वर देवराई, आंबाघाट,सह्याद्री व्यग्रहप्रकल्प माहिती केंद्र, आंबाघाट ,रत्नदुर्ग किल्ला, रत्नागिरी,रत्नागिरी फिश बंदर,मत्स्य संग्रहालय, झाडगाव,गणपतीपुळे, रत्नागिरी,महाबळेश्वर इत्यादी ठिकाणी नेण्यात आली. विभिन्न ठिकाणी पाहिलेल्या वनस्पती आणि त्यांचे वैशिष्ट्य लीड बोटॅनिकल गार्डन, कोल्हापूर पिनेटम जिम्नोस्पर्म्सच्या 25 प्रजाती, जसे की Agathis alba circinalis Ginkgo bilobab फेर्नरी 59 प्रजातींचे फर्न, (Angiopteris evecta Equisetum ramosissimum) ऑर्किडेरियम 88 प्रजातींचे ऑर्किड, जसे की Habenaria longicorniculata Spathoglottis plicata आरईटी प्रजाती धोक्यात असलेल्या वनस्पतींचे संरक्षण आणि संवर्धन.पावनखिंड, कोल्हापूर ऐतिहासिक महत्त्व असलेल्या या ठिकाणी वनस्पतींच्या विविधतेचे निरीक्षण केले. आंबेश्वर देवराई, आंबाघाट हिरव्यागार झाडांची छत्री, औषधी वनस्पती आणि स्थानिक वनस्पतींचे संरक्षण.सह्याद्री व्यग्रहप्रकल्प माहिती केंद्र,आंबाघाट वनस्पती, प्राणी, पक्षी आणि किटकांच्या संवर्धनाच्या पद्धतींबद्दल माहिती देण्यात आली. यावेळी रत्नागिरी फिश बंदर समुद्री जीवसृष्टीची विविधता आणि मत्स्यपालनाच्या पद्धतींचे निरीक्षण केले.मत्स्य संग्रहालय, झाडगाव मुद्रा जीवसृष्टीची विविधता आणि संरक्षणाची गरज. गणपतीपुळे, रत्नागिरी समुद्रकिनारी वनस्पती आणि शैवालांचे संग्रहण. महाबळेश्वर स्ट्रॉबेरीच्या लागवडीचे निरीक्षण आणि इतर स्थानिक वनस्पती. बोटॅनिकल गार्डनमध्ये वनस्पतींचे जर्मप्लाझम संरक्षण, बीज बँक, आरईटी प्रजातींचे संवर्धन. सह्याद्री व्यग्रहप्रकल्प वनस्पती आणि प्राण्यांच्या संवर्धनासाठी स्थानिक समुदायांचा सहभाग, मत्स्य संग्रहालय समुद्री जीवसृष्टीचे संरक्षण आणि जागरूकता निर्माण करणे. विद्यार्थ्यांना वनस्पतींच्या विविधतेबद्दल प्रत्यक्ष ज्ञान मिळाले. निसर्गाच्या जवळ येऊन पर्यावरणाचे महत्त्व समजले.संशोधन आणि संवर्धनाच्या पद्धतींबद्दल जागरूकता निर्माण झाली.अशा सहली वारंवार आयोजित करणे.स्थानिक समुदायांचा सहभाग वाढवणे.वनस्पती आणि प्राण्यांच्या संरक्षणासाठी जागरूकता कार्यक्रम आयोजित करणे.सहलीतून मिळालेल्या अनुभवांचा शैक्षणिक अभ्यासक्रमात समावेश करणे. या सहलीतून विद्यार्थ्यांना निसर्गाचे महत्त्व समजले आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्याची प्रेरणा मिळाली.भविष्यात अशा सहलींद्वारे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन सुधारता येईल.
यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी आपले संशोधन अनुभव प्रकट केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.सुनील जाधव यांनी सांगितले की महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक,क्रिडा व सांस्कृतिक विकासासाठी कटिबद्ध आहे.विद्यार्थ्यांंना हवे त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील.शेवटी उपस्थितांचे आभार डॉ.सचिन चव्हाण यांनी मानले.