तुळजापूर (प्रतिनिधी) - तुळजापूर नगरपरीषद अंतर्गत शहरातील विकास कामांच्या भूमीपुजन सोहळ्या साठी नगरपरीषद ने छापलेल्या निमंत्रण पञिकेवर चक्क ज्या विकास भूमीपुजन आहे ते न छापल्याने ही पञिका शहरात चर्चचा विषय ठरली आहे. यातुन नगरपरीषदचा भोंगळ कारभार माञ उघडकीस आला आहे.
पालकमंञी प्रताप सरनाईक यांच्या हस्ते नगरपरीषद अंतर्गत करण्यात येणाऱ्या कोट्यावधी रुपयांचा विकास कामांचा भूमीपुजन सोहळा बुधवार दि. 20 फेब्रुवारी रोजी संपन्न होणार होता. या सोहळ्या पार्श्वभूमीवर नगरपरीषदने निमंत्रण पञिका काढल्या व शहरात वाटल्या. माञ या निमंत्रण पञिकेवर पालकमंञी सह लोकप्रतिनिधी जिल्हाधिकारी,उपविभागीय अधिकारीसह आयुक्त मुख्याधिकारी यांचे नावे छापले. माञ ज्या कोट्यावधी रुपयाचा विकास कामांचा उल्लेख न केल्याने शहरवासियांना कुठला विकास कामांचा भूमीपुजन सोहळा हे समजले नाही. त्यामुळे ही निमंत्रण पञिका शहरात चर्चची विषय ठरली. या निमंत्रण पञिकेला झालेला खर्च वाया तर गेला नाही ना असा सवाल शहर वासियांमधुन होत आहे. या प्रकरणाची प्रशासन काय दखल घेणार याची उत्सुकता निर्माणा झाली आहे.
मुख्याधिकारीनी झेराँक्स पञिका वाटुन वेळ नेली निभावुन !
या प्रकरणी मुख्याधिकारी लक्षमण कुंभार यांना विचारताच त्यांनी दुसरी विकास कामांची नावे असलेली झेराँक्स पञिका विचारणा करणाऱ्यांना वाँटसाप वर पाठवुन वेळ भागवुन नेली .
कलर विकास कामांचे नाव नसलेली ! कार्यक्रम पञिका
ब्लँकव्हाईट मुख्याधिकारी यांनी वाटसाप वर टाकलेली विकास कामांचा उल्लेख असलेली निमंत्रण पञिका.