तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील सारोळा ग्रामपंचायतीचा सात पैकी पाच सदस्यांनी सरपंच उपसरपंच यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केला असुन या प्रकरणी 3 मार्च 2025 रोजी ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभा दुपारी बारा वाजता बोलवली आहे.
सारोळा ग्रामपंचायत सरपंच श्रीमती रेखा बेले, उपसरपंच आकाश गणेश म्हेत्रे यांच्या विरुध्द पंचायतीच्या सभेत मनमानी कारभार कारणे, ग्रामसभा व मासिक बैठक मागील 13 महिन्यांपासून न घेणे, ग्रामपंचातयीच्या सर्व व्यवहारामध्ये अनियमीतता व भ्रष्टाचार, सदस्यास अरेरावीची भाषा वापरणे व हीन वागणूक देणे, विकासकामे न करता काम झाल्याचे दाखवुन लाखो रुपये शासकीय निधाचा अपहार करणे या कारणास्तव सदस्य श्रीमती त्रिशाला विनोद पाटील, श्रीमती निकीता सुशिल धनके, श्रीमती अंबिका उषाकांत मंडवळकर, श्रीमती माधुरी शिवाजी कांबळे, माधुरी कांबळे, प्रविण विठ्ठल नागदे यांनी हा ठराव दाखल केला आहे.