भूम (प्रतिनिधी)- चोखोबा ते तुकोबा एक वारी समतेची साधू संतांच्या विचाराची हे ब्रीद वाक्य घेऊन पूर्णपणे या प्रवाहामध्ये समर्पण करून घेतलेले अभ्यासू व्यक्तिमत्व असलेले सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व समता वारीच्या अध्यक्ष साहित्यिक प्रा. अलका सपकाळ यांच्या नेतृत्वात निघालेल्या संत चोखोबा आणि संत तुकोबा यांच्या विचाराचा प्रसार आणि प्रचार करण्याच्या अनुषंगाने 1 जानेवारी ते 12 जानेवारी 2025 या कालावधीत श्री संत चोखामेळा महाराजांची कर्मभूमी असलेल्या मंगळवेढा येथून समता वारीचा प्रबोधन रथाचा 9 जिल्ह्यात 1750 किलो मीटर अंतर मंगळवेढा येथे प्रारंभ होवून देहू येथे समारोप झाला.
या दरम्यान ठिकठिकाणी समतावारी प्रबोधन रथाचे स्वागत केले गेले. अनेक अनुभव आले. या संपूर्ण वारी दरम्यानचा लेखाजोखा चित्रमय रथ पुस्तकाच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आला. यामध्ये मत, अभिप्राय लेखन स्वरूपात प्रकाशन करण्यात आले. या चोखोबा ते तुकोबा एक वारी समतेची - चित्रमय कार्य अहवाल पुस्तिका प्रकाशित करताना लातूर भाजपचे खासदार डॉ. सुनिल गायकवाड, प्राचार्य डॉ. राजेंद्र थोरात, साहित्यिक श्यामसुंदर मुळे, जयश्री तोडकर, लक्ष्मण चिलवंत, देवीदास बिनवडे, अविनाश अभंगराव, पत्रकार शंकर खामकर भूम, अशोकराव म्हस्के, आशा राऊत कळंब आदिची प्रमुख उपस्थिती होती.