धाराशिव (प्रतिनिधी) - दिल्ली येथील बाबू जगजीवन राम कला संस्कृती तथा साहित्य अकॅदमीच्यावतीने देण्यात येणारा डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्कार - 2025 धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण महिला पोलीस नाईक मुक्ता प्रकाश लोखंडे यांना जाहीर झाला आहे.

या पुरस्कार वितरण सोहळ्याचे वितरण गोवा येथील पाटृ बस स्थानका जवळील आर्ट आणि कला विभाग संस्कृती भवन पंजिम येथे दि.16 फेब्रुवारी रोजी गोव्याचे माजी मुख्यमंत्री चंद्रकांत कवलेकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास सिने अभिनेते झाकीर खान, नागपूर विद्यापीठाचे माजी उप कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण, अकॅदमीचे अध्यक्ष डॉ. एन.एस. खोबा, डॉ. संदीप खोचर, प्रदेशाध्यक्ष प्रथमेश अबनवे, प्रा.डॉ. बी.एन. खरात, प्रा गोरख साठे, पपेतल्ला रविकांत, महेंद्र सिंग, धनंजय डांगळे आदींसह इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या पुरस्काराबद्दल लोखंडे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.

 
Top