धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यात दि. 21 ते 24 फेब्रुवारीपर्यंत एकूण 20 कावळ्यांचा बर्ड फ्ल्यूने मृत्यू झाल्याची घडली होती. त्यानंतर मंगळवार दि. 25 फेब्रुवारी रोजी एका कावळ्यांचा मृत्यू झाला आहे. तर बुधवार दि. 26 फेब्रुवारी रोजी सहा कावळ्यांचा मृत्यू झाला आहे. तर 27 फेब्रुवारीला एका कावळ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ढोकीमध्ये एकूण 28 कावळ्यांचा मृत्यू झाला आहे. 

ढोकी पोलिस ठाणे परिसर व येथील सुभाषराव देशमुख यांच्या घराच्या पाठीमागील परिसरात शुक्रवारी 8, शनिवारी 8 तर सोमवारी 4 अशा एकूण तीन दिवसात एकूण 20 कावळ्यांचा मृत्यू झाला होता. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी तत्काळ भेट देवून पंचनामा केला. यावेळी जिल्हा पशुसंवर्धन विभाग आयुक्त प्रभू पुजारी, सहायक आयुक्त मुकूंद तावरे, डॉ. टेकाळे, डॉ.शेळके, ग्रामसेवक राठोड, उपसरपंच पापा समुद्रे, कुक्कुटपालक ग्रामस्थ होते. अधिकाऱ्यांनी ढोकी येथील मृत कावळ्यांची पाहणी करून परिसरात गावकऱ्यांसह पशुपालकांना विश्वासात घेत बैठक घेतली. यावेळी कुक्कुटपालकांनी घ्यावयाची दक्षता व उपाययोजनांबाबतही मार्गदर्शन केले. जिल्हाधिकारी यांनी पशुसंवर्धन विभागाला उपाययोजनांबाबत आदेश दिले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ढोकी पोलिस ठाणे परिसर तसेच देशमुख यांच्या घराच्या पाठीमागील भागापासून 10 किलोमीटरचे क्षेत्र अलर्ट झोन म्हणून घोषित केले. 


परत 8 कावळ्यांचा मृत्यू 

पशुसंर्वधन विभाग जंतुनाशक फवारणी करीत असताना देखील मंगळवार, बुधवार, गुरूवार या तीन दिवशी एकूण 8 कावळ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कावळ्यांच्या मृत्यूची संख्या 28 वर गेली आहे. बर्ड फ्ल्यूची लागण नेमकी कोठे होत आहे यांचा शोध घेतला जात आहे. दक्षता म्हणून या भागात जंतूनाशक फवारणी चालूच असल्याची माहिती डॉ. आशिष टेकाळे यांनी दिली. 

 
Top