धाराशिव (प्रतिनिधी)-  कुसुमाग्रजांप्रमाणे चौफेर आणि ज्ञानपीठ पुरस्काराच्या दर्जाचं लेखन नव्या पिढीने केलं पाहिजे “ असे विचार नगर वाचनालयाचे 

व म.सा.प. चे अध्यक्ष नितीन तावडे यानी व्यक्त केले. ते मराठी भाषा गौरव दिनानिमित्त नगर वाचनालय येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. 

ते पुढे म्हणाले की, वि.वा.शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांनी कविता,कथा, कादंबरी,ललित लेखन ,निबंध,नाटक अशा सर्वच साहित्यप्रकारामध्ये खूप मोठी आणि दर्जेदार साहित्यनिर्मिती करून मराठी भाषेची मोठी सेवा केली आहे. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन नव्या पिढीतील लेखकांनी साहित्य निर्मिती करून मराठी भाषेची सेवा करावी.

यावेळी कार्यक्रमास उद्योजक बालाजी जोळदापके, व्यापारी सूरज वांजरे, वेलनेस कोच दयानंद बनसोडे, सामाजिक कार्यकर्ते सुदेश माळाळे व नगर वाचनालयाचे ग्रंथपाल सुयोग जोशी, सहाय्यक ग्रंथपाल विजय वाघमारे, डी.के.शेख, उषा पानढवले, महानंदा मसने,याकूब पठाण ई. कर्मचारी व वाचक मोठ्या संख्येने उपस्थिती होते.

 
Top