धाराशिव (प्रतिनिधी)-  आज टेंभुर्णी- लातूर या रस्त्यावरील येडशी ते बोरगाव (काळे) महामार्ग क्र.63 या 37 किमी लांबी व 574 कोटी रूपयाच्या होणाऱ्या चौपदरी रस्त्याच्या बाबत नागरिकांसमवेत परिसंवाद ढोकी येथे पार पडला. यामध्ये डिसेंबर 2026 पर्यंत येडशी ते बोरगाव रस्त्याचे चौपदरीकरण पूर्ण होणार असल्याची माहिती खासदार ओमराजेनिंबाळकर यांनी दिली.       

राष्ट्रीय महामार्ग क्र. 211  येडशी येथील बार्शी रोडच्या उड्डानपुलापासून येडशी गावास बायपास रस्ता होणार असून  तो पुढे येडशीच्या बाहेर लातूर रोडला जोडला जाणार आहे.  तसेच ढोकी येथे उड्डानपुल होणार असून कसबे तडवळे येथे गावातून जाणार आहे. पुढे ढोकी येथे कळंब चौक येथे  उड्डाणपूल होणार असून त्यामुळे ढोकी येथील मुख्य चौकातील ट्रॉफीक व होणारे अपघात टळणार आहेत. या महामार्गावर 12 बसस्थानके होणार आहेत. या रस्त्याची निवीदा प्रक्रीया सुरु असून दि. 17/02/2025 रोजी या महामार्गाची निवीदा उघडली जाणार आहे. त्यानंतर पुढील चार महिण्यात सर्व कायदेशीर प्रक्रीया पुर्ण होवून पुढील 4 महिण्यात कार्यारंभ आदेश पात्र कंत्राटधारकाला दिला जाणार आहे व त्याची मुदत ही 18 महिण्याची राहणार आहे. त्यामुळे साधारणत: डिसेंबर 2026 पर्यंत हा रस्ता पुर्ण चौपदरीकरण होणार आहे. 

या परीसंवादासाठी या महामार्गाचे कार्यकारी अभियंता सुमंत व कंसल्टंट तसेच ढोकी येथील माजी सरपंच पापा समुद्रे, संग्राम देशमुख, तुळशीदास जमाले, चंद्रप्रकाश जमाले, गजेंद्र नलावडे, तानाजी जमाले, विशाल जमाले, डॉ. चांडक श्री. तवले, बी.एन. डोंगरे, विनोद थोडसरे, मुरलीधर लोमटे, शकील काझी, शाकेर शेख, सुनिल नाईकनवरे, धाबेकर सरपंच तसेच येडशी ,तडवळे, दुधगाव, ढोकी, कोल्हेगाव, ढोराळा व मुरुड येथील प्रतिष्ठीत नागरीक व व्यवसायीक मोठया संख्येने उपस्थीत होते. सन 2019 ला  लोकसभा सदस्य झाल्यापासून या महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी सतत संबंधीत खात्याशी पाठपुरवा केल्याने हा रस्ता पुर्ण होत असल्याचे समाधान व आनंद नागरीकांच्या माध्यमातून व्यक्त होत आहे.

 
Top