धाराशिव (प्रतिनिधी)-डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या 34 व्या नामविस्तार दिन आणि ख्वॉजा शमशोद्दीन गाजी रहे. यांच्या 720 व्या उरूसानिमित्त शनिवार, 18 जानेवारी रोजी शहरातील भीमनगर शिंगाडे वाडा येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात नागरिकांनी आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे अवााहन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे कार्यकारिणी सदस्य तथा राष्ट्रवादीचे सांस्कृतिक विभागाचे जिल्हाध्यक्ष विशाल शिंगाडे यांनी केले आहे.
या सर्वरोगनिदान शिबिरात नागरिकांची डोळे तपासणी, चष्मा वितरण, महिलांचे विविध आजारांचे निदान, कर्करोग तपासणी, रक्त व इतर तपासण्या, त्वचा व केसांचे विकार आदी आजारांची तज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी करून औषधे, मार्गदर्शन देण्यात येणार आहे. या शिबिराचा शहर व परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.