तेर (प्रतिनिधी )जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या संस्थानच्या वतीने आयोजित धाराशिव तालुक्यातील तेर येथील ग्रामीण रुग्णालयात रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात १७१ रक्तदात्यानी रक्तदान केले.शिबीराचे उद्घाटन आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले व रक्तदान केलेल्या रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी प्रविण बंडे, हभप बालाजी महाराज थोरात, श्रीजीत इंगळे, बाळासाहेब कानडे,. राम दीक्षित, हनुमंत मेंगले, कल्याण गाढवे,बप्पा कनेरे, कालिदास हाजगुडे, राजश्री कासार, अनिता इंगळे, सुरेखा दीक्षित, संगीता डोलारे, कीर्ती चौगुले,उषा मेंगले, राधा माळी,रेखा पांगरकर, संजय इंगळे,अभिजीत सराफ ,शिवाजी पडुळकर यांनी परिश्रम घेतले.