कळंब (प्रतिनिधी)- 12 फेब्रुवारी 2025 रोजी श्री. संत गुरू रविदास महाराज यांची जयंती आहे. या निमित्ताने हा जयंती उत्सव रविवार दि. 23 फेब्रुवारी 2025 रोजी श्री संत गुरू रविदास महाराज मंदिर विद्यानगरी कळंब या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
या जयंती उत्सवाच्या संदर्भात राष्ट्रीय चर्मकार महासंघाची बैठक राष्ट्रीय चर्मकार महासंघ जनसंपर्क कार्यालय कळंब येथे मराठवाडा युवक अध्यक्ष मा. विकास कदम यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
जयंती उत्सवाच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील गुणवंतांचा गुणगौरव सोहळा दिनांक 23 फेब्रुवारी 2025 रोजी आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्त श्री संत रविदास महाराज जयंती उत्सव समितीची स्थापना करण्यात आली. यावेळी नवनियुक्त जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष शिवाजी शिंदे, उपाध्यक्ष परमेश्वर कदम, सचिव हनुमंत कांबळे, सहसचिव धनराज लोहकरे, मार्गदर्शक बाबासाहेब कांबळे, कार्याध्यक्ष रमेश शिंदे, कोषाध्यक्ष दामोदर वेताळ, सल्लागार संजित पाखरे व श्याम शिंदे, कार्यक्रम प्रमुख लिंबराज ठोंबरे यांची निवड करण्यात आली. या बैठकीचे आयोजन महासंघाचे तालुकाध्यक्ष अशोक लाड व युवक तालुकाध्यक्ष सतीश कदम यांनी केले होते.