धाराशिव (प्रतिनिधी)-येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित, रामकृष्ण परमहंस महाविद्यालय, धाराशिव येथे  स्वामी विवेकानंद जयंती निमित्त विभागीय स्पर्धा दिनांक 30 जानेवारी 2025 रोजी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मराठवाडा विभाग प्रमुख तथा रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाल्या.

यामध्ये निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा ,कराओके स्पर्धा, चित्रकला स्पर्धा ,सुगम गायन स्पर्धा इत्यादींचा समावेश करण्यात आला होता.यामध्ये प्राथमिक गट, माध्यमिक, उच्च माध्यमिक, महाविद्यालयीन आणि गुरुदेव कार्यकर्ता असे गट तयार करून स्पर्धा घेण्यात आल्या.

सदर स्पर्धेमध्ये अकरा माध्यमिक विद्यालय, सहा उच्च माध्यमिक विद्यालय, आठ वरिष्ठ महाविद्यालय सहभागी झालेली होती. विभागीय स्पर्धेमध्ये यश संपादन केलेल्या स्पर्धकांना राज्यस्तरावर दिनांक 8 फेब्रुवारी 2025 रोजी संपन्न होणाऱ्या स्पर्धेसाठी पाठवण्यात येणार आहे. अशी माहिती  मराठवाडा विभाग प्रमुख प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांनी दिली. या स्पर्धेसाठी प्रा.डॉ.केशव क्षीरसागर, डॉ. वैभव आगळे, प्रा. राजा जगताप, डॉ. दत्तात्रय साखरे यांनी समन्वयक म्हणून महत्वपूर्ण भूमिका बजावली. 

 
Top