धाराशिव (प्रतिनिधी)- पराक्रमी विरांचा ऐतिहासिक वारसा म्हणजे भीमा कोरेगाव विजयी शौर्य गाथा, या विजयी शौर्याच्या 207 व्या दिनानिमित्त फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने नियोजित मोकळ्या जागेतील तथागत गौतम बुद्ध यांच्या मुर्तीस वंदन करुन अभिवादन करण्यात आले. सध्या भारतीय संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष चालु आहे. संविधान निर्माते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन सामुदायिक बुध्द वंदना घेण्यात आली.

यावेळी राणा बनसोडे, अंकुश उबाळे, धनंजय वाघमारे, बाबासाहेब बनसोडे, गुणवंत सोनवणे, गणेश वाघमारे, प्रविण जगताप, बाबासाहेब गुळीग, बलभीम कांबळे, नामदेव वाघमारे, संपतराव शिंदे, अमर आगळे, बापु कुचेकर, बाबासाहेब बनसोडे, अतुल लष्करे, स्वराज जानराव, माने सह महिला भगिनी, समता सैनिक दलाचे भीम सैनिक उपस्थित होते.

 
Top