कळंब (प्रतिनिधी)- नवीन वर्षाच्या निमित्ताने स्वा. गणपतरावजी कथले युवक आघाडीच्या पुढाकारातून सुदृढ आरोग्याचा संदेश देत मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झाली आहे.
स्वा. गणपतरावजी कथले युवक आघाडीच्यावतीने सलग आठव्या वर्षी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. शहरातील नगर परिषद शाळा क्रमांक-1 येथून स्पर्धांअसून छत्रपती शिवाजी महाराज चौक ते लक्ष्मी रोड मार्गे डिकसळ येथील केंब्रिज स्कूल या मार्गाने मॅरेथॉनचा मार्ग ठेवण्यात आला होता. या स्पर्धामध्ये 270 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. नगर पालिका शाळा क्रमांक 1 येथे पहाटे सहा वाजता पोलीस उपनिरीक्षक प्रभा पुंडगे यांनी हिरवा झेंडा दाखवून स्पर्धा सुरू करण्यात आली.
या स्पर्धमध्ये विद्यार्थी, यूवक, युवती व जेष्ठांनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जिल्हा बाहेरुण सुध्दा स्पर्धक आले होते. विजेत्याचे बक्षीस वितरण लक्ष्मण मोहिते, डॉ. बाळकृष्ण भवर, बाळकृष्ण तांबारे, प्रा. संजय घुले, संजय देवडा, डॉ.रामकृष्ण लोंढे, विठ्ठल माने, अतूल गायकवाड, महादेव खराटे, प्रा. जगदीश गवळी, बाळासाहेब जाधवर यांच्या हस्ते देण्यात आले आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कथले आघाडीचे बाळासाहेब कथले, सुमित बलदोटा, शीतलकुमार घोंगडे, शिवाजी शिरसाठ, रमेश अंबिरकर, बापू भंडारे,पंकज कोटेचा,यश सुराणा, ओंकार कुलकर्णी, गोविंद खंडेलवाल, भाऊसाहेब शिंदे, अशोक फल्ले, नवनाथ पूरी, वैभव कोळपे, धर्मराज पूरी, रोहीत किरवे,राहुल किरवे आदी उपस्थित होते.
हे ठरले विजेते
गट 6 ते 15 मुलीमध्ये प्रथम प्रांजली बंदू भराटे, व्दितीय धनश्री मनोज करंजकर, तृतीय अंजली नवनाथ भराटे विजयी झाले. गट मुले 6 ते 15 प्रथम समीर मुस्तान शेख, व्दितीय प्रतीक धनंजय मुंगळे, तृतीय करण खंडू बिक्कड विजयी झाले. खुला महिला गट प्रथम आदिती धर्मराज राऊत, व्दितीय रुपाली लालासाहेब कुरुंद, तृतीय संध्या विष्णू डोंगरे विजयी झाल्या आहेत. पुरुष खुला गट प्रथम विराज विजयकुमार जाधवर, व्दितीय पंकज बाळू राठोड, तृतीय दीपक विलास पवार विजयी झाले. वय 45 पुढील गटात प्रथम सुरेश श्रीरंग काकडे, व्दितीय रामचंद्र विश्वनाथ जाधवर, तृतीय हनुमंत श्रीमंत मुळीक, तर विशेष सन्मान विराज सचिन क्षिरसागर, तैमूर असमर खान, लक्ष्मी लटपटे यांचा करण्यात आला आहे.