तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील तामलवाडी ते पिंपळा बु.या रस्ता  काम पुर्ण करण्याची मुदत संपनही काम  रखडल्याने या मार्गावरुन प्रवास करणारे ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी यांचे हाल होत असल्याने हे रस्ता काम तात्काळ पुर्ण करण्याची मागणी होत आहे.

 तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी ते पिंपळा बु. जवळपास 5 कि.मी. च्या या रस्त्याचे काम दि. 27.12.2023 ते 26.12.2024 पर्यंत या 12 महीन्याच्या कालावधीत हे काम पुर्ण होणे अपेक्षित होते. मागील महिन्यात कामाला आरंभ झाला. सध्या रस्त्यावर खडी टाकुन व काही ठिकाणी रस्ता अर्धवट खोदून ठेवला आहे. याचा ग्रामस्थांना हकनाक त्रास सहन करावा लागत आहे.  या रस्त्यावर सतत किरकोळ  आपघात होत आहेत. तरी तात्काळ या रस्त्याचे  दर्जदार काम पुर्ण करण्याची मागणी होत आहे.


 
Top