तुळजापूर (प्रतिनिधी)- श्रीतुळजाभवानी मातेस द्राक्ष बागेतील पहिला तोड माल श्रीतुळजाभवानी चरणी अर्पण केली. श्रीतुळजाभवानी माता ही शेतकरी कष्टकऱ्यांची देवी म्हणून प्रसिध्द आहे. शेतकरी आपल्या शेतातील पहिले धान्य तोड माल देविचरणी अर्पण करतो. मगच विकतो व भोजनात वापरतात.
शुक्रवारी मोर्डा येथील देविभक्त शेतकरी दत्ता खताळ यांनी आपल्या शेतातील द्राक्ष बागेतील पहिली द्राक्ष तोड कँरेट देविचरणी अर्पण केले. देविजींची नित्योपचार पुजा झाल्यानंतर 51 किलो द्राक्ष देविजींचा सिहासनावर मांडण्यात आले. राञी अभिषेक पुर्वी हे द्राक्ष सिंहासनावरुन काढून भाविकांना प्रसाद म्हणून वाटप करण्यात आले.