धाराशिव (प्रतिनिधी)-भारतीय जनता युवा मोर्चा मराठवाडा विभागाची बैठक छत्रपती संभाजीनगर भाजप महानगर कार्यालय, क्रांती चौक येथे पार पडली. या बैठकीच्या अनुषंगाने धाराशिव ,तुळजापूर युवा मोर्चाच्या येथे पार पडलेल्या बैठकीत 18 ते 25 वयोगटातील तरुणांना भाजपसोबत जोडण्यासाठी 26 जानेवारी ते 19 फेब्रुवारी या कालावधीत सदस्यता नोंदणी मोहिम राबवण्याच्या दृष्टीने दत्तप्रसाद जाधव प्रदेश सचिव तथा मराठवाडा अभियान सहसंयोजक व भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री.राजसिंहा राजेनिंबाळकर यांनी सखोल मार्गदर्शन केले
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या नेतृत्वाखाली,प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपच्या सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट समोर ठेऊन सदस्य नोंदणी वाढविण्यासाठी सूचना यावेळी दिल्या. ज्यामुळे पक्षाची ताकद आणखी वाढेल आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये भाजपाला घवघवीत यश मिळेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र प्रगतीची नवी उंची गाठेल. तसेच महाराष्ट्र आता थांबणार नाही आणि राष्ट्रनिर्मितीत महत्त्वपूर्ण योगदान देईल असा निश्चय केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताचा केलेला संकल्प सिद्धीस घेऊन जाण्यासाठी आणि महाराष्ट्राला वैभवशाली बनविण्यासाठी सर्व भाजपा कार्यकर्ते पक्षसंघटनेसाठी तसेच सदस्यता नोंदणी अभियान यशस्वीपणे राबवतील आणि भाजपच्या विजयाचा झेंडा फडकवतील असा विश्वास आहे.
यावेळी आनंद कंदले तुळजापूर युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अजित खापरे तालुकाध्यक्ष युवा मोर्चा धाराशिव,नानासाहेब पाटील कळंब धाराशिव विधानसभा संयोजक, गणेश एडके कोषाध्यक्ष युवा मोर्चा, सचिन लोंढे अ.जा.मोर्चा. महाराष्ट्र राज्य, महेश बागल, प्रसाद मुंडे धाराशिव शहर युवा मोर्चा, धनराज नवले विद्यार्थी जिल्हाध्यक्ष, भगवंत गुंड, गणेश सूर्यवंशी ,अभिजीत इंगळे, सूर्याजी गायकवाड, वैभव हावडे, सिद्धार्थ चंदनशिवे, महेश सोनटक्के, संग्राम पडवळ, आकाश कानडे, ओंकार देवकते, नवनाथ सोलंनकर, चैतन्य माने, अभिषेक पवार, सम्यक माळाळे, सुजित उंबरे, बंटी गंगणे, राजेश्वर कदम, समर्थ पैलवान, रत्नदीप भोसले, रोहित चव्हाण, मुदस्सर शेख, मेघराज बागल , राम चोपदार ,सागर पारडे, राहुल साठे ,अप्पा पवार इत्यादी उपस्थीत होते.