धाराशिव (प्रतिनिधी)- शिक्षण महर्षी सुभाषदादा कोळगे सहकारी पतसंस्थेच्या 2025 वार्षिक दिनदर्शिकेचे प्रकाशन गुरुवारी( दि.02) रोजी सेवानिवृत्त पोस्टमास्टर तथा प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय आनंद नगर धाराशिव सेंटरचे ब्रह्माकुमार सुरेश भाई जगदाळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
शहरातील पोलिस लाईन समोरील संस्थेच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या दिनदर्शिका प्रकाशन कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून सुरेश भाई जगदाळे यांची उपस्थिती होती. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा प्रदेश सचिव माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास कोळगे, भारतीय किसान संघाचे जिल्हाध्यक्ष नितीन घुले, श्री साई श्रद्धा एज्युकेशन संचालक प्रा. सोमनाथ लांडगे, पत्रकार सुभाष कदम -पाटील, तेरचे पत्रकार नरहरी बडवे, संतोष बडवे,डॉ वसंत मुंडे, महादेव सुर्यवंशी रेवा एंटरटरप्राईजेसचे संचालक मनोज पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी संस्थेचे अध्यक्ष रामदास कोळगे व पत्रकार सुभाष कदम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मान्यवरांच्या हस्ते त्यांचे शाल, पुष्पहार देऊन अभिष्टचिंतन करण्यात आले यावेळी व्यवस्थापक शाम गंगावणे कर्मचारी वैशाली जोशी, आवेज शेख, श्रीकांत काशिद, शाम शेरखाने यांच्यासह संस्थेचे सभासद, ठेवीदार हितचिंतक यांची उपस्थिती होती.