मुरुम (प्रतिनीधी)- महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र धाराशीव आणि श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय वाणिज्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी 15 दिवसाच्या आरीवर्क  प्रशिक्षणचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षणात 30 महिलांनी सहभाग घेतला. 

आधुनिक बदलत्या फॅशन नुसार शहरी आणि ग्रामीण महिलांची वाढत्या मागणी विचारात घेऊन  महिलांसाठी आरीवर्क  प्रशिक्षण उपयुक्त ठरेल अनिष्ट रोजगार संधी उपलब्ध करील असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय अस्वले यानी केले. शिवाजी महाविद्यालयात या प्रशिक्षणाचा समारोप झाला यावेळी अध्यक्षीय समारोपात डॉ अस्वले यानी महिलांनी प्रशिक्षण घेऊन स्वावलंबी व्हावे असे आवाहन केले. यावेळी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र धाराशिवचे प्रकल्प अधिकारी पांडुरंग मोरे यांनी प्रशिक्षित महिलांना उद्योग उभारणीस सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. प्रोग्राम समन्वयक सतीश चव्हाण यांनी सहकार्य केले. या समारोपात अशोक चव्हाण यांनी प्रशिक्षित महिलांनी व्यावसाय उद्योग कसा करावा याचा मंत्र देतांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

प्रशिक्षणार्थी महिलांनी बनवलेल्या.  आरीवर्क ला रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. यामध्ये प्रथम क्रमांक भारती चौगुले, द्वितीय क्रमांक अशादेवी सोनकवडे, तृतीय क्रमांक शिल्पा गायकवाड आणि उत्तेजनार्थ अंकिता पाटील व ज्योती अंकुश यांना मिळाला आहे. ज्योती पवार यानी महिलांना प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणासाठी वाणिज्य विभागाचे डॉ. अजित अष्टे, प्रा. खंडू मुरलीकर, प्रा. अक्षता बिरादार, प्रा. विद्या गायकवाड, प्रा. संध्याराणी चौगुले, प्रा. विद्या गायकवाड प्रा. राणी बेंबलगे, प्रा. अंजली चव्हाण यांनी सहकार्य केले आहे.


 
Top