तुळजापूर (प्रतिनिधी)- 'बहुजन हिताय बहुजन सुखाय' हे ब्रीदवाक्य घेऊन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने वेगवेगळ्या माध्यमातून सुखकर प्रवास म्हणून लालपरी नागरिकांच्या दिमतीला दिल्या. पण ग्रामीण भागातील प्रवाशाच्या नशिबी खटारा बसेस असुन वरुन चांगल्या दिसणाऱ्या गाड्या माञ राञी अपराञी रस्ता बंद पडत असल्याच्या दिसत आहेत. तुळजापूर तालुक्यातील  तामलवाडी येथे सोलापुरहुन तुळजापूरकडे जाणाऱ्या एसटीचे पुढचे चाक निखळुन पडले आणि एसटी बस मधील 25 प्रवाशी बालंबाल बचावल्याची घटना रविवार दि.12 जानेवारी रोजी दुपारी 4.वा  तुळजापूर सोलापूर महामार्गावर असणाऱ्या तामलवाडी येथे उघडकिस आली.

सोलापूर येथुन प्रवाशी घेऊन निघालेली एसटी बस बस क्रं. एम एच 20 बी एल 1070 ही बस 20 ते 25 प्रवाशी घेऊन तुळजापूर कडे निघाली होती. तामलवाडी येथील टोलनाक्यावरुन थोडे पुढे गेल्यावर सदरील एसटी बसचे पुढचे चाकच निखळले व बाजुला पडले. चालकाने प्रसंगावधान राखून बस थांबवली त्यामुळे अपघात होता होता वाचला बसमधील 20 ते 25 प्रवाशी बालंबाल बचावले. हा प्रकार दुपारी साधारणतः 4 वाजणेच्या सुमारास घडला होता परंतु रात्रीचे 9 वाजले तरीही तुळजापूर आगारामधुन कोणीही या नादुरुस्त एसटीकडे फिरकले नव्हते.  एसटी बस ही सरळ रस्त्याने जात असताना चाक निखळले उताराला ही घटना घडली असती तर मोठा अनर्थ घडला असता या घटनेमुळे एसटी बस प्रवास असुरक्षित बनत असल्याने वेळीच या बाबतीत एसटी महामंडळाने दक्षता घेणे बनले आहे.

 
Top