तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील श्रीतुळजाभवानी मंदीर परिसरातील दशावतार मठा जवळील केशव कदम परिवाराच्या वतीने संक्रांती निमित्ताने ब आयोजित हळदी-कुंकू कार्यक्रमास महिलांच्या मोठा प्रतिसाद लाभला.
प्रारंभी श्रीतुळजाभवानी माता, राजमाता माँ जिजाऊ प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन या कार्यक्रमास आरंभ झाला. साक्षी कदम, समिक्षा कदम यांनी काढलेल्या मयुर आकर्षक रांगोळीने सर्वाचे लक्ष वेधुन घेतले. या कार्यक्रमात हळदी कुंकू, तिळगुळ वाण, पारंपरिक भेटवस्तू, देविचे वर्षभराचे धार्मिक विधीची माहीती असलेले दिनदर्शिका वाटप करण्यात आले. पद्यमजा श्रीकांत कदम, मंजुषा प्रविण कदम यांचे हस्ते वाण देण्यात आले.