धाराशिव (प्रतिनिधी)- राज्यस्तरीय शालेय थ्रोबॉल स्पर्धेत वडगांव सिद्धेश्वर जि.प. प्रशालेच्या संघाला सुवर्णपदक मिळाले आहे. ही राज्यस्तरीय स्पर्धा जोतिर्लिंग पब्लिक स्कूल, माले, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर येथे नुकतीच पार पडली.

शालेय थ्रोबॉल स्पर्धेत वडगांव जि.प. प्रशालेचा संघ जोतिर्लिंग पब्लिक स्कूल माले, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर येथे सुरु असलेल्या स्पर्धेत सहभागी होऊन साखळी सामन्यामध्ये कोल्हापूर संघासोबत एकतर्फी विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला. उपांत्यपूर्व फेरीत मुंबई संघांवर दणदणीत विजय मिळवून फायनल मध्ये प्रवेश केला.  दिनांक 17 जानेवारी 2025 रोजी झालेल्या अंतिम सामन्यात अमरावती विभागाला पराभूत करून वडगाव (सि). जि.प. प्रशालेच्या संघाने सुवर्णपदक प्राप्त केले आहे. 

या  विजयी संघास महाराष्ट्र थ्रोबल असोसिएशनचे सचिव राहुल वाघमारे, विलास निरभवणे, दिनेश आहिरे, ज्योतिर्लिंग पब्लिक स्कूल संस्था अध्यक्ष शिवलिंग कळंत्रे, कोल्हापूर जिल्हा क्रीडा अधिकारी अरुण पाटील, श्रीमती कळंत्रे, सर्व क्रीडा शिक्षक, कोच, पंच इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत खेळाडूंना सुवर्णपदक, ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला आहे.  

याबद्दल लातूर शिक्षण विभागाचे उपसंचालक डॉ गणपतराव मोरे, विजयी संघाचे टीम कोच तसेच धाराशिव थ्रोबॉल संघटना सदस्य हनुमंत माळी, टीम व्यवस्थापक मदने, थ्रोबॉल संघटना अध्यक्ष तथा विद्यमान सरपंच बळीराम कांबळे वडगांव (सि), उपाध्यक्ष सुनिल पांढरे, थ्रोबॉल संघटना सचिव बालाजी पवार, तुकाराम वाडकर, मुख्याध्यापक ज्योती राऊत, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सोमनाथ पाटील आदीनीं अभिनंदन केले. 

 
Top