धाराशिव (प्रतिनिधी)- माहे 9 फेब्रुवारी 2025 रोजी शिर्डी येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सहकार परिषद चे आयोजन करण्यात आले आहे. त्या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन,विचारविनिमय करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा उर्फ काकासाहेब कोयटे यांची समर्थ हॉल, समर्थ नगर, धाराशिव येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. रुपामाता समूहाचे प्रमुख अँड व्यंकटराव गुंड यांच्या हस्ते पुष्पगुछ देवून स्वागत करण्यात आले.
बैठकीमध्ये शिर्डी येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेमध्ये जगातील सर्व देशांची संघटना युनो यांनी येणारे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार म्हणून सादर करावे असे सांगण्यात आले. या आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेला 12 देशाचे प्रतिनिधी, 6 राज्यांचे प्रतिनिधी, 50 परदेशी प्रतिनिधी, 50 सहकार खात्याचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या प्रदर्शनाचे, महाराष्ट्राच्या लोकगाताचे, सहकार दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे तद्पुर्वी माहे 4 फेब्रुवारी रोजी सहकार दिंडीचे धाराशिव शहरात आगमन होनार असून त्याचे जालोषमध्ये स्वागत करण्यात येणार आहे.
शिर्डी येथे होणा-या आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेला सर्व जिल्ह्यातील पतसंस्थेचे चेअरमन, अधिकारी, कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांनी केले आहे. या बैठकीला रुपामाता समूहाचे प्रमुख अँड व्यंकटराव गुंड, सहकार भारतीचे जिल्हाध्यक्ष डॉ. हर्षल डंबल, यशवंत नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन सतीश दंडनाईक व इतर जिल्ह्यातील सर्व सहकारी पतसंस्थाचे चेअरमन, अधिकारी, कर्मचारी उपस्थितीत होते.