धाराशिव (प्रतिनिधी) - संपूर्ण महाराष्ट्रभर नादुरुस्त (Faulty) मिटरच्या जागी स्मार्ट मिटर (प्रीपेड मिटर) बसवण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे मिटर रिडींग घेणाऱ्या व वीज बिल वाटणाऱ्या कामगारांवर येणाऱ्या काळात बेरोजगारीची वेळ येऊन त्यांच्या रोजगारावर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना वयाच्या साठ वर्षापर्यंत रोजगाराची शाश्वती द्यावी यासह इतर मागण्यांसाठी दि.१ फेब्रुवारीपासून मिटर रिडींग व बील वाटपाचे काम बंद करणार असल्याचा इशारा एस.एस.ई.डी.सी.एल मिटर रिडर कंत्राटी कामगार संघटनेच्यावतीने धाराशिव येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अधिक्षक अभियंत्यांना एका निवेदनाद्वारे दि.२४ जानेवारी रोजी दिला आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे आले आहे की, स्मार्ट मिटर लागल्यावर शासनाने मिटर रिडींग घेणाऱ्या व वीज बिल वाटणाऱ्या कामगारांना वयाच्या ६० वर्षांपर्यंत रोजगाराची शाश्वती दयावी. याबाबत नागपूर येथील हिवाळी अधिवेशन दरम्यान उपोषण केल्यानंतर उर्जा सचिवांनी संघटनेस चर्चेसाठी बैठकीचे आश्वासन दिले होते. परंतू एक महिन्याच्या कालावधी लोटला असून संघटनेला कुठल्याही प्रकारच्या चर्चेला बोलवलेले नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना कामबंद आंदोलनाशिवाय कुठलाही पर्याय राहिला नाही. तसेच महावितरण व शासन सोबत चर्चा करुन मिटर रिडर व बील वाटप कामगार यांच्या श्वासत रोजगारावी निश्चिती करत नाही. तोपर्यंत काम बंद आंदोलनास नाईलाजाने सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शासनाचे व महावितरण यांचे कुठल्या प्रकारचे आर्थिक नुकसान झाल्यास त्यासाठी एम.एस.ई.डी.सी.एल मिटर रिडर कामगार संघटनेला वेठीस धरु नये अशी मागणी केली आहे. या निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष सुरज सुरवसे, उपाध्यक्ष सुधीर गायकवाड, सुनील पुराने, सचिव सोमनाथ चिंचकर, सहसचिव मुजिब पटेल, चितामणी वडजे,कोषाध्यक्ष अजय शिवलकर, सह कोषाध्यक्ष ऋषिकेश कलगुडे, सचिन सोनटक्के, कार्याध्यक्ष सचिन साळुंके, संघटक मंत्री लखन डावकरे, अंगद काळे, सदस्य पंडीत तोडकर, सुरज ढोबळे, नितीन गायकवाड, विश्वास बनसोडे, राजकुमार कुलकर्णी, बसाया येलूरे, नितीन माने, सोमनाथ खुद, संदेश गिरी, विनायक गुळवे यांच्या सह्या आहेत.