धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील कलाविष्कार अकादमी द्वारा हौशी छंदी गायकांचा समुह मेलडी स्टार्स समुहाच्या वतीने जयहिंद आझाद सेनेचे प्रणेते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती दिनी अभिवादन करण्यात आले.
मेलडी स्टार्सचे संस्थापक अध्यक्ष युवराज नळे , सह समन्वयक शरद वड गाकर , मल्हारी माने , विधिज्ञ दिपक पाटील, संस्कार भारती जिल्हाध्यक्ष श्यामसुंदर भन्साळी , अनिल मालखरे आदी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले. युवराज नळे यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा स्वातंत्र्य लढ्यातील जीवनपट उलघटडला .या अभिवादन प्रसंगी कु. क्षितीजा निंबाळकर , तौफिक शेख , नितीन बनसोडे, अतुल कुलकर्णी ,सुजीत अंबुरे, सुर्यकांत कारंडे,सौ. वर्षा नळे ,सौ. तारा मोरे , सुनिता माने , सुलक्षणा टिळक, विधिज्ञ विद्युलता शिरिष दलभंजन , अक्षय भन्साळी, महेश उंबर्गीकर , मुनीर शेख , मारुती लोंढे उपस्थित होते. सुत्रसंचालन प्रभाकर चोराखळीकर यांनी केले तर आभार कलाध्यापक शेषनाथ वाघ यांनी मानले.