तुळजापूर (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टी व महिला मोर्चा तुळजापूर सदस्याचा नोंदणी अभियान शुभारंभ मिनाताई सोमाजी भाजपा उद्योग आघाडी सह समन्वयक सदस्य महिला मोर्चा महाराष्ट्र यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महिला मोर्चा प्रदेश अध्यक्षा तथा आमदार चित्राताई वाघ,संघटन पर्व सदस्यता अभियानाचे महाराष्ट्र राज्य प्रभारी रवींद्र चव्हाण तसेच तुळजापूर तालुक्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या नेतृत्वात धाराशिव जिल्हाध्यक्ष
संतांजी चालुक्य पाटील, प्रदेश कार्यकारणी सदस्य अनिल काळे, सदस्य नोंदणी अभियान जिल्हा प्रमुख इंद्रजीत देवकते यांच्या मार्गदर्शनात आयोजक मिनाताई सोमाजी, भाजपा उद्योग आघाडी सह समन्वयक सदस्य महिला मोर्चा महाराष्ट्र यांच्या वतीने सदस्यता नोंदणी अभियान राबविण्यात आले.
यावेळी यावेळी प्रमुख उपस्थिती भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत नोंदणीस प्रारंभ करण्यात आली. यावेळी भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष नंदाताई पूनगडे, युवा नेते विनोद गंगणे, आनंद कंदले, संदीप गंगणे, धैर्यशील दरेकर, उमेश गवते, गिरीश देवळालकर, सागर पारडे, राम चोपदार, इंग्रजी साळुंखे, आप्पा पवार, हेमा कदम, रूपाली घाडगे, लता सोमाजी, सविता भोसले, लता हरवळकर, अरुणा कावरे, राधा घोगरे, शिला कदम, नमिता डावखरे या कार्यक्रमासाठी शहरातील असंख्य महिला व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.