तुळजापूर (प्रतिनिधी) - दर्पन दिना निमित्ताने शुक्रवार दि10रोजी पंचायतसमिती सभागृहात आयोजित पञकाराच्या सन्मान माजी मंञी मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी व्यासपीठावर जिप माजी बांधकाम सभापती मुकुंद डोंगरे, माजी उपनगराध्यक्ष अमर मगर, तुळजापूर तालुका पञकार संघ अध्यक्ष तथा जेष्ट पञकार अंबादास पोफळे, तुळजापूर पंचायत समितीचे माजी सभापती शिवाजी गायकवाड, नळदुर्ग काँग्रेस शहर कमिटीचे अध्यक्ष नवाज काझी, तुळजापूर तालुक पत्रकार संघाचे तालुकअध्यक्ष ए. टी. पोफळे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस समितीचे महासचिव अभिजीत चव्हाण कुलस्वामिनी सहकारी सूतगिरणीचे संचालक विलास सरडे, रसिक वाले, देवसिंगा तुळचे सरपंच दत्ता मस्के, अँड जगदीश कुलकर्णी, सिंदफळ सोसायटीचे माजी चेअरमन रवी कापसे आदी उपस्थित होते.
प्रारंभी माजीमंञी मधुकर चव्हाण यांच्या हस्ते पञकारांना भेट वस्तु देवुन सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना चव्हाण पुढे म्हणाले कि, .मायेची तुमच्या वर प्रेम करणाऱ्या ची शाल घालावी यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे सांगुन सत्य लिहा चांगले काम करणाऱ्यांची दखल घ्या. चुक केली असेल तर चुक म्हणून बातमी लिहा. वाईट कामावर लिखणी चालवुन काम चांगले करुन घ्या. तुम्ही स्वताला कमी समजू नका जनतेचे प्रश्न शासनाकडे मांडा व सोडविण्यासाठी लेखणी चालवा. मी तीन पिढ्या बघितल्या. पंचायतसमिती ते मंञीमंडळा असा माझा राजकिय प्रवास झाला. यात तुमचे सहकार्य मला प्रचंड मिळाले. तुम सहकार्यामुळे मी तालुक्यात विकास कामे करु शकलो. 21 टीएमसी पाण्याची पाण्यासाठी मी मंञीपद नको म्हणलो. अन्याय अत्याचार विरोधात लेखणी चालवा. यावेळी पञकारांनी आपले मनोगत व्यक्त केल. कार्यक्रमाचे सुञसंचलन भैरवनाथ कानडे यांनी केले. तर आभार माजी सभापती शिवाजी गायकवाड यांनी मानले.