तुळजापूर (प्रतिनिधी) - श्रीतुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवराञ उत्सवतील दुसऱ्या माळेदिनी  बुधवार दि. 8 जानेवारी रोजी  श्रीतुळजाभवानी मातेच्या सिंहासनावर रथ अलंकार पूजा महापुजा मांडण्यात आली होती.

श्री तुळजाभवानी मातेस मंदीर संस्थान तर्फे  मांडण्यात आलेल्या ही पुजा मांडण्या बाबतीत अशी आख्यायिका सांगितले जाते कि,भगवान सूर्यनारायणांनी श्री देवीस त्रिलोक भ्रमणासाठी आपला रथ दिला.त्या प्रसंगाची आठवण म्हणून देविजींचा सिंहासनावर रथ अलंकार महापूजा बांधली (मांडली) जाते. श्रीतुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्र उत्सव उत्सवात दर्शन घेण्यासाठी  भाविक गर्दी करीत आहे. राञी छबिना मिरवणूक नंतर महंत वाकोजीबुवा यांनी प्रक्षाळ पुजा केल्यानंतर शाकंभरी नवरात्र उत्सव मधील दुसऱ्या माळेच्या धार्मिक  विधीचा सांगता झाला. श्रीतुळजाभवानी मातेच्या पहिल्या माळे दिनी मंगळवार दि. 7 जानेवारी रोजी मंदीर प्रांगणात वाघ वाहनावर छबिना काढण्यात आला होता. या सोहळ्यात भाविकांनी मोठ्या संखेने सहभाग नोंदवला.

 
Top