तुळजापूर (प्रतिनिधी)- श्रीतुळजाभवानी मंदीर हाकेच्या अंतरावर असलेल्या भवानी रोडवरील नगरपरीषद मालकीच्या जीर्ण झालेल्या शाँपीग सेंटर मधील दुसऱ्या मजल्यावर असलेल्या एका खोलीत ऐका अनोळखी इसमाचा आळ्या किडे पडलेला, सडलेल्या अवस्थेत मंगळवार दि. 7 जानेवारी रोजी सकाळी मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
सदरील इसम पन्नास वर्षचा असावा असे बोलले जाते. तिर्थक्षेञ तुळजापूर शहरातील भवानी रोड लगत असलेल्या नगरपरीषद शाँपींग सेंटर मधील दुसऱ्या मजल्यावर डीझीटल लावण्यास गेलेल्या कामगारांना ऐका खोलीत वास येत असल्याचे निदर्शनास येताच त्यांनी आत पाहिले असता एक सडलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला. सदरील इसम दुसऱ्या मजल्यावर असलेल्या खोलीत मरुन पडला तिथे कुणीही जात नसल्याने व ही खोली दुसऱ्या मजल्यावर असल्याने ना मृतदेहाचा वास ना दिसुन आला.
सुवर्णश्वर गणेश मंदिराच्या शेजारी नगरपरिषद तुळजापूर कार्यालयाच्या शॉपिंग सेंटरच्या वरच्या मजल्यावर पडीक व दुर्लक्षित असलेल्या गाळ्यात कुत्रे व इतर प्राण्यांचा वावर असतो. तिथे कुणीही जात नाही. सदरील अनोळखी इसमा पंधरा दिवसा मयत झाला असल्याची शक्यता आहे. सदरील इसमाचा मृतदेहा किडे मुग्यंनि खिल्याने त्यास अळ्या लागल्या होता. मृतदेहा चा अंगात हिरवा शर्ट असुन जवळ पँट सापडली
ज्यांना कुणास याची ओळख आहे त्यांनी तुळजापूर पोलिस स्टेशनला माहीती द्यावी. असे आवाहन बीट अमंलदार गुरुनाथ लोंखडे यांनी केले आहे.सदरील इसम हा रिकाम्या बाटल्या गोळा करुन जगत होता .दोन ते अडीच वर्षा पुर्वी कलकत्ता येथुन आल्याचे सांगण्यात आहे अधाप त्याची ओळख पटली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.