धाराशिव (प्रतिनिधी)- नितळी गावचे ग्रामदैवत खंडोबा यात्रा कमिटी व समस्त नितळीकर ग्रामस्थांच्या वतीने दरवर्षी कुस्ती मैदान भरते. नितळी गावची कुस्ती परंपरा ही देदिप्यमान आहे. गावातील कुस्तीचा इतिहास हा प्राचीन आहे तात्या वारीक,बिंचू कोतवाल,बब्रु रणदिवे, कल्याण क्षिरसागर, गुरुलिंग तेली, नवनाथ घारगे, साहेबा जाधव, उत्तम कदम, बळी माने, आत्माराम काकडे, वसंत सुरवसे,चंदू काकडे, धनू वरपे,विलास घारगे, दादा सुरवसे, चांगदेव वरपे, दादा क्षिरसागर, नाना काकडे, तुकाराम भोसले,पांडु कदम, भिमा धायगुडे हे गावातील नामवंत पैलवान मंडळी होय. गावातील पैलवानांनी राज्यातील अनेक मैदानं गाजवताना नवनाथ घारगे, उत्तम कदम, गोपाळ घारगे,नाना काकडे यांनी मातीतील कुस्तीसह स्पर्धात्मक कुस्तीत सुद्धा पदकाला गवसणी घालत महाराष्ट्र चॅम्पीयन होण्याचा बहुमान मिळवला . हे गावच्या कुस्तीचे वैभव आहे. याच नितळी गावचे भव्य दिव्य कुस्ती मैदानं संपन्न झाले. 100 रुपया ईनामापासून मैदान चालू झाल्यानंतर अंतिम लढत ही 21000 रु व सन्मानाची गदा ठेवण्यात आली . अंतिम कुस्तीचे आश्रयदाते युवा उदयोजक दादासाहेब शिवाजी घारगे यांच्या वतीने 21000/- रु व सन्मानाची गदा बक्षीस ठेवण्यात आले . अंतिम लढतीसाठी एकुण दहा पैलवान एकमेंकाना भिडले . विविध झुंजार लढती पाहून गांवकऱ्यांच्या डोळ्याचे पारणे फिटले . अंतिम लढत पै .दिपक सगरे लातुर विरुद्ध पै .धनराज गाडे हातलाई संकुल धाराशिव यांच्यात आली .अतिशय तगड्या लढतीत धनराज गाडे पैलवानाने विजय संपादित करीत नितळीकर केसरी किताबाचा मानकरी ठरल . यावेळी गांवकऱ्यांनी आनंद व्यक्त करीत संपन्न झाल्याचे जाहीर केले . गावची पैलवानकी जपण्यासाठी आज गावात युवा उदयोजक दादासाहेब शिवाजी घारगे यांनी कुस्तीसाठी दिलेले आर्थिक सहकार्य हे प्रत्येकाच्या स्मरणात राहील . मैदानासाठी बाणासाहेब खांडेकर, नागनाथ पवार, डबल उपमह मौलासाब शेख, दयानंद साळुंके, अरुण हावळे, महेश कुलकर्णी, माणिक सावंत, शिवाजी मोरे यांची उपस्थिती लाभली .अशा प्रकारे हातलाई कुस्ती संकुलात पैलवान धनराज गाडे यांनी नितळी गावचे मैदान गाजवले . धनराज हा शिक्षणमहर्षी सुधीर अण्णा पाटील, युवानेते अभिराम भैया पाटील, कुस्ती कोच चॅम्पीयन सुंदर भाऊ जवळगे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो . ग्रामस्थांनी तब्बल सहा तास या कुस्ती मैदानाचा आनंद घेतला. तर झुंजार लढतीत विजयी झालेल्या पैलवानांवरती बक्षिसांचा वर्षाव करीत विजेत्या पैलवानांचे कौतुक करीत कुस्ती मैदान यशस्वी केले.